गुजर बाल विकास मंदिरात पालकांचा ठिय्या

बारामती- येथील विद्या प्रतिष्ठानचे, विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर शाळेत शुल्कवाढीच्या विरोधात चौकशी सुरू असताना, तसेच शाळेने विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी तगादा लावू नये व निकालापासून वंचित ठेऊ नये असे शिक्षणाधिकाऱ्यांनी लेखी कळविले असताना देखील शाळेत फी न भरणाऱ्यांना प्रगती अहवाल देण्यास शाळेने आज (शनिवारी) नकार दिला असता, पालकांची शाळेतच ठिय्या आंदोलन केले.
शाळेत चौकशी अहवालावर कार्यवाही सुरू आहे, त्यादरम्यान विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी तगादा लावू नये तसेच निकालापासून वंचित ठेवू नये असे पत्र पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. 26) दिले होते. परंतु, ज्या पालकांनी फी भरली नाही त्यांना प्रगती अहवाल देण्यास शाळेतून टाळाटाळ करण्यात आली. शासनाने वेळोवेळी आदेश असताना सुद्धा मुख्याध्यापिका मनमानेल त्याप्रमाणे निर्णय घेत असल्याने पालकांनी जोपर्यंत प्रगती अहवाल देत नाही, तोपर्यंत शाळेतच बसून राहणार असा पवित्रा घेतला. उपशिक्षण संचालक मिनाक्षी राऊत यांनी सुद्धा भ्रमणध्वनीद्वारे मुख्याध्यापिकांना कल्पना दिली असता, मुख्याध्यापिका ऐकण्याच्या तयारी नव्हत्या. काही पालकांनी मध्यस्थी करून ज्या पालकांनी 2017-2018 ची काहीच फी भरली नाही त्यांनी प्रथम सत्राची फी भरून प्रगती अहवाल घेऊन जावा असा मध्य काढला त्यास पालकांनी संमत्ती दर्शविली. पालकांनी धनादेश किंवा रोख स्वरूपात शाळेच्या कार्यालयात फी जमा केली.
सलग चार दिवस सुट्टी असल्याने शाळा व शासनाच्या अधिकाऱ्यांनी पालकांना वेठीस धरल्याच्या प्रतिक्रीया त्रस्त पालकांनी यावेळी बोलून दाखविल्या. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सुरू असलेला भ्रष्टाचार व अधिकाऱ्यांचा मनमानेल कारभारामुळे गेल्या एक वर्षापासून शुल्क वाढीच्या विरोधात निकाल देण्यास अधिकारी वर्ग उदासिनता दाखवित असल्याचे पालकांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)