तळेगाव ढमढेरे- स्वातंत्र्यसैनिक आर.बी गुजर प्रशालेत शनिवारी (दि.14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य माणिक सातकर हे होते. यावेळी त्यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील आर.बी गुजर प्रशालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करत असताना आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार योगेश चव्हाण यांच्या हस्ते घालण्यात आला. तर श्रीफल चंद्रकांत कयांग यांच्या हस्ते वाढविण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य जगदीश राऊतमारे, पर्यवेक्षक राजाराम पुराने, नितीन माने, मोहन ओमासे, महेश नांदखिले तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी बाबासाहेबांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवावेत. सर्वधर्म समभावाने वागावे, असे प्राचार्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळप्रमुख शिवाजी आढाव यांनी केले. तर, आभार चव्हाण यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)