गुजर प्रशालेत छत्रपती शाहूमहाराज जयंती

तळेगाव ढमढेरे- स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत छत्रपती शाहूमहाराज जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने प्रशालेचे उपप्राचार्य जगदीश राऊतमारे यांच्या हस्ते राजर्षि शाहूमहाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
राजर्षि शाहूमहारज यांनी जनतेसाठी केलेल्या दूरदर्शी कार्याची माहिती सांस्कृतिक मंडळ अध्यक्ष शिवाजीराव आढाव यांनी मुलांना दिली. याप्रसंगी प्राचार्य माणिकराव सातकर, पर्यवेक्षक राजाराम पुराणे, गुलाबराव गवळे, नितीन माने, सुनिता पिंगळे, रजनी राऊतमारे, प्रियांका नांदखिले तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार राजाराम पुराणे यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)