गुजरात सरकारविरोधात समाजवादी पक्षाची निदर्शने

पिंपरी – उत्तर प्रदेश व बिहारच्या नागरिकांना गुजरातमध्ये होत असलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ समाजवादी पक्षाच्या वतीने पिंपरी चौकात गुरुवारी (दि. 11) निदर्शने करण्यात आली.

शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निदर्शने करण्यात आली. यावेळी गुजरात सरकारच्या विरोधात तर संविधानाच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. पोटा-पाण्यासाठी उत्तर प्रदेश व बिहार मधील अनेक कामगार गुजरातमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे या कामगारांविरोधात रान पेटविण्यात आले आहे. त्यामुळे या राज्यातील औद्योगिक वसाहतींबरोबरच विविध भागांमधील उत्तर प्रदेश व बिहारच्या कामगारांना मारहाण केली जात आहे. ही मारहाण टाळण्यासाठी आतापर्यंत हजारो कामगारांनी गुजरातमधून पलायन केले आहे.

रफिक कुरेशी म्हणाले की, उत्तर प्रदेश व बिहार मधील कामगारांच्या माध्यमातून गुजरात मधील औद्योगिक वसाहतींमध्ये स्वस्तात मनुष्यबळ उपलब्ध होत असल्याने, गुजरातच्या विकासामध्ये उत्तर प्रदेश व बिहारच्या कामगारांची महत्त्वाची भुमिका आहे. मात्र, एखाद्या घटनेला सर्वच कामगारांना जबाबदार ठरविणे योग्य नाही. त्याचा विपरित परिणाम गुजरातच्या विकासावर होऊ शकतो. तरी देखील गुजरात सरकार या कामगारांना संरक्षण देण्यात अपयशी ठरले आहे.

या आंदोलनात रफिक कुरेशी, पुणे शहराध्यक्ष दिनेश यादव, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रवी यादव, महिला शहराध्यक्षा वहिदा शेख, समाजवादी युवजन सभेचे राष्ट्रीय सचिव रतन सोनकर, अशोक यादव आदी सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)