गुजरात सरकारलाही बदलाचंय आता अहमदाबादचे नाव 

अहमदाबाद – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबादचे नाव बदलून अयोध्या ठेवल्यानंतर आता गुजरात सरकारनेही अहमदाबादचे नाव बदलण्याची घोषणा केली आहे. अहमदाबादचे नाव कर्णावती ठेवण्याच्या विचारात सरकार असल्याचे गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगतिले.

नितीन पटेल म्हणाले कि, अहमदाबादचे नाव कर्णावती व्हावे अशी लोकांची भावना आहे. आम्हाला लोकांकडून जर समर्थन मिळाले तर आम्ही कायदेशीर अडथळेही पार करून नक्कीच अहमदाबादचे नाव कर्णावती करू, असे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अहमदाबाद ११ व्या शतकात अशावाल नावाने ओळखले  जात होते. अंहिलवाड़ाच्या चालुक्य राजा कर्ण याने अशावलच्या भिल्ल राजाविरोधात लढाई जिंकली त्यानंतर त्याने अशावलचे नाव बदलून कर्णावती असे ठेवले. १४११ साली सुल्‍तान अहमद शाहने कर्णावतीजवळ एका नव्या शहराचा पाय रचला. येथील चार संतांच्या नावावर अहमद शाहने या शहराचे नाव अहमदाबाद ठेवले. परंतु, आता पुन्हा अहमदाबादचे नाव बदलून कर्णावती ठेवण्याचा विचार सरकार करत असल्याचे नितीन पटेल यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)