गुजरात सचिवालयाच्या आवारात बिबट्याची घूसखोरी-अखेर पकडण्यात यश!

File photo

अहमदाबाद (गुजरात): सोमवारी पहाटेच्या सुमारास एका बिबट्याने कडक सुरक्षा असलेल्या सचिवालयाच्या आवारात घूसखोरी केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वन विभागाने बिबट्याची शोधमोहीम सुरू केली. गांधीनगरमधील या गुजरात सचिवालयाच्या आवारात अन्य मंत्री, ज्येष्ठ नोकरशहा आणि शासकीय विभागांच्या कार्यालयांबरोबर मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांचीही कार्यालये आहेत. या प्रकारामुळे सचिवालयात चांगलीच खळबळ उडाली होती. शंभर पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनंतर अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात दुपारच्या सुमारास यश आले. सचिवालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांना सचिवालयाच्या आवारात प्रवेश न करण्याच्या सूचना तत्पूर्वी देण्यात आल्या होत्या.

पहाटे दोनच्या सुमारास एका बिबट्याने गेट क्रमांक सातच्या खालून सचिवालयाच्या आवारात प्रवेश केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत दिसून आले. प्रथम एखादा कुत्रा शिरला असावा असा सुरक्षाकर्मींचा समज झाला. पण नंतर तो बिबट्या असल्याचे लक्षात येताच सर्वजण हादरून गेले. हा बिबट्या वाट चुकून सचिवालय आवारात घुसला असावा, असे सांगून वन विभागाचे अतिरिक्त सचिव राजीव कुमार गुप्ता पुढे म्हणाले, की राजधानी भोवतीच्या 40-50 चौ.किमीच्या परिसरातील वन्यजीवांचा बिबट्या एक घटक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)