गुजरात मधील 20 आमदारांचा बंडाचा झेंडा

मोदी – शहांची वाढली डोकेदुखी
अहमदाबाद – पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये सरकारविरोधी वातावरण असतानाही, गेल्या वर्षीच्या निवडणुकीत सलग सहाव्यांदा भाजपाचं कमळ उमललं. परंतु, मोदी-शहा दिल्लीत व्यग्र असताना त्यांच्या किल्ल्यातच अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या आहेत.

गुजरातमधील सरकारी बाबूंच्या मुजोरीचा मुद्दा उचलत, भाजपाच्या तीन आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यांचा रोख मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्याकडे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आपणच नाही, तर 20 आमदार भाजपावर नाराज असल्याचा दावा या त्रिकुटाने केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडी ‘मिशन 2019’च्या तयारीला लागली असतानाच, गुजरात भाजपामध्ये सारं काही आलबेल नसल्याचं चित्र या प्रकारामुळे समोर आलं आहे. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत आणि त्यांना उत्तरदायी आहोत. परंतु, गुजरातमधील सरकारी अधिकारी आमचं म्हणणं ऐकतच नाहीत, अशी तक्रार आमदार मधु श्रीवास्तव, केतन इनामदार आणि योगेश पटेल यांनी केली आहे. हे प्रकरण थेट दिल्ली दरबारी घेऊन जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. परंतु, सरकारी बाबूंच्या खांद्यावर बंदुक ठेवून हे आमदार मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री रुपानी हे सध्या इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत आमदारांनी हा मुद्दा उचलला, हे सूचक असल्याचं मानलं जात आहे.

दोनच दिवसांपूर्वी अमित शहा यांनी गुजरातला भेट दिली होती. 2019 च्या निवडणुकीबाबत त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. या दौऱ्यानंतर लगेचच भाजपा आमदारांच्या नाराजीचा सूर उमटला आहे. त्यामुळे मोदी-शहांची डोकेदुखी वाढण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)