गुजराती,महाराष्ट्रीयन लोकांनो आठवड्यात बनारस सोडा, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार रहा

गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांचे पडसाद देशभर दिसत आहेत. त्यातच उत्तरप्रदेशमधील एक संघटना ‘उत्तर प्रदेश-बिहार एकता मंच’ यांनी वाराणसीत अनेक ठिकाणी पोस्टर्समध्ये लावले असून त्याच्या माध्यमातून गुजराती आणि महाराष्ट्रीयन लोकांना धमकी देत आहेत. त्यांनी या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्रा मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला.

“बनारसमध्ये निवासी असलेल्या सर्व गुजराती आणि महाराष्ट्रीयन लोकांना अपील आहे की त्यांनी एका आठवड्याच्या आत बनारस सोडून जावे. अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहा.” असा धमकीवजा संदेश ‘उत्तर प्रदेश-बिहार एकता मंच’ यांनी लावलेल्या पोस्टरमध्ये आहे.

-Ads-

गुजरातमध्ये एका बिहारी मजुराने तेथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे उघड झाल्याने उत्तर गुजरातमधील जनतेने बिहार आणि यूपीच्या लोकांवर हल्ले सुरू केले. त्यामुळे त्या राज्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू झाले आहे. हल्ल्यांचे हे प्रमाण व्यापक आहे. यूपी व बिहारी लोकांना तेथून अक्षरश: जीव मुठीत घेऊन पळावे लागले आहे.

या प्रकारानंतर गुजरातच्या पोलीस महासंचालकांनी तातडीने उपाययोजना सुरू केली आणि साऱ्या राज्यातील पोलीस दल कामाला लावून हल्लेखोरांचे अटकसत्र सुरू केले होते. सुमारे पाचशे जणांना या प्रकरणात त्यांनी अटक केली आहे. ओबीसींचे गुजरातमधील नेते अल्पेश ठाकोर यांच्या संघटनेने परप्रांतीयांच्या विरोधात हे आंदोलन सुरू केल्यामुळे या हल्ल्यांमागे कॉंग्रेसचाच हात असल्याची ओरड भाजपच्या लोकांनी सुरू केली आहे.

या घटनेचे उत्तर प्रदेशातही राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. यूपीच्या लोकांना गुजरातमध्ये काम करू देणार नसाल तर आम्ही आता वाराणसीतून मोदींना पुन्हा निवडून देणार नाही, अशी घोषणा काही संघटनांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)