गुजरातमध्ये भूकंपाचे झटके 

कच्छ  – गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात आज भूकंपाचे झटके जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्‍टर स्केलवर नोंदविण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. या भूकंपानंतर कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे कळते.

गांधीनगरमध्ये दुपारी 12 वाजून 57 मिनिटाला भुकंपाचे झटके बसल्याचे भूकंप संशोधन संस्थेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. याचे केंद्र भचाऊपासून 14 किलोमीटर उत्तर-पश्‍चिममध्ये होते. दरम्यान, 2001 मध्ये कच्छ जिल्ह्यात विनाशकारी भूकंप आला होता. ज्यात हजारों नागरिकांचा बळी गेला होता. तसेच लाखोंच्यावर घर उद्‌ध्वस्त झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)