गुजरातमध्ये दुचाकी, कार आणि टेम्पोचा विचित्र अपघात

सुरत : गुजरातच्या व्यारामध्ये काकरापार रस्त्यावर एक भीषण अपघात झाला आहे. दुचाकी, कार आणि टेम्पोच्या या भीषण अपघाताची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या सुरतमध्ये उपचार सुरु आहेत.

तापी जिल्ह्यातील इंदू गावाजवळील उड्डाण पुलाच्या चौफुलीवर हा तिहेरी अपघात झाला. कार व्याराहून सुरतकडे जात असताना त्याचवेळी एक दुचाकीस्वार कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी अचानक समोरुन येणाऱ्या टेम्पोला या दुचाकीस्वाराची जोरदार धडक बसली. त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी काकरापार पोलीस ठाण्यात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)