गुजरातमधून पाठवण्यात येणारा भेसळयुक्त जिऱ्याचा साठा जप्त

सुरत : गुजरातमधील एका निर्यात केंद्रातून पाठवण्यात येणारा भेसळयुक्त जिऱ्याचा साठा मसाले मंडळाला हाती लागला आहे. हे निर्यात केंद्र राज्य अन्न व औषधी नियंत्रण प्रशासनाच्या कक्षेत येते. येथून १२.५ टन साठा जप्त करण्यात आला आहे.

भारतीय मसाले मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, कांडला येथील गुणवत्ता परीक्षण प्रयोगशाळेत या साठ्याची तपासणी करण्यात आली. त्यात सुमारे २३.३ टक्के प्रमाणात बाह्य घटक आढळून आले आहेत. नमुन्यांमध्ये याची कमाल मर्यादा ३ टक्के असावी. त्यामुळे यात भेसळ झाल्याचे स्पष्ट आहे.

भारत हा जिऱ्याचा प्रमुख निर्यातदार देश आहे. एप्रिल-डिसेंबर २०१७ दरम्यान निर्यात करण्यात आलेल्या मसाले उत्पादनांत याचे प्रमाण १०४,२६० टन इतके होते. याची किंमत १,७६२ कोटी रुपये इतकी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)