गुजरातमधील भाजपच्या आमदाराला खूनप्रकरणी जन्मठेप

अहमदाबाद -गुजरातमधील भाजपचे आमदार जयराजसिंह जडेजा यांना आज उच्च न्यायालयाने 13 वर्षांपूर्वीच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जमिनीच्या वादातून फेब्रुवारी 2004 मध्ये एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याप्रकरणी न्यायालयाने जडेजा यांच्यासह तिघा दोषींना जन्मठेप सुनावली.

याप्रकरणी जामीन मिळाल्याने बाहेर असलेल्या तिन्ही दोषींना 30 सप्टेंबरपर्यंत आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले आहे. याआधी 2010 मध्ये राजकोटमधील द्रुतगती न्यायालयाने जडेजा यांना आरोपमुक्त केले होते. त्यावेळी त्या न्यायालयाने जडेजा यांचा साथीदार समीर पठाणला दोषी ठरवत जन्मठेप सुनावली. त्या निर्णयाला पठाणबरोबरच राज्य सरकारने गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर आज उच्च न्यायालयाने निकाल दिला. दोषींमध्ये एक माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह राणाचाही समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)