गुजरातमधील प्रलंबित वायूतळाला सरकारकडून मंजुरी 

 नवी दिल्ली : भारतीय वायूदलाच्या दीर्घकाळापासून प्रलंबित एका योजनेला सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत भारतीय वायूदल पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या उत्तरपूर्व गुजरातच्या बनासकांठा जिल्हय़ातील डिसा येथे स्वतःचा तळ स्थापन करणार आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने या निर्णयाला मंजुरी दिली.

समितीने प्रारंभी धावपट्टीचा विस्तार, लढाऊ विमानांसाठी हँगर अणि प्रशासकीय सुविधांसाठी 1000 कोटींच्या गुंतवणुकीला मंजुरी दिल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱयाने सांगितले. डीसा विमानतळाच्या छोटय़ा आकारातील धावपट्टीला 1000 मीटरमध्ये बदलण्याचा प्रस्ताव अगोदरच मांडण्यात आला होता. परंतु त्यावरील निर्णय दीर्घकाळापासून प्रलंबित होता.  या विमानतळाचा वापर हेलिकॉप्टर लँडिंग आणि व्हीव्हीआयपींच्या आगमनासाठी केला जातो.

या वायूतळासाठी 4000 एकर जमिनीचे अधिग्रहण सुमारे दोन दशकांपूर्वीच करण्यात आले होते. तरीही ही योजना प्रलंबित राहिली होती. हा वायूतळ बाडमेर आणि भूज वायूतळांमधील अंतर भरण्यासोबतच सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. दीर्घकाळापासून मंजुरीची प्रतीक्षा करणाऱया या प्रस्तावाला संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राधान्य दिले होते. या वायूतळावर कोणत्याप्रकारची लढाऊ विमाने तैनात होतील हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. परंतु हा तळ कोणत्याही आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यास महत्त्वाचा ठरणार आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)