गुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज सुपर सिरीज्‌ टेनिस स्पर्धा 
पाचगणी, दि.15 – मुलांच्या गटात गुजरातच्या व्रज गोहिल याने तर मुलींच्या गटात प्रियांका राणा या बिगरमानांकीत खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत येथे होत असलेल्या रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल 12 वर्षाखालील सुपर सिरीज्‌ टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात बिगरमानांकीत मानांकित गुजरातच्या व्रज गोहिलने चौथ्या मानांकित कर्नाटकाच्या क्रिश त्यागीचा 6-4, 6-2 असा एकतर्फी पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवित विजयी आगेकूच नोंदवली. तर, याच गटात दुसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या अर्णव पापरकरने तन्मय देशपांडेचा 6-1, 6-0 असा सहज पराभव केला. तर, अन्य एका सामन्यात सातव्या मानांकित वेदांत भासीनने केयूर म्हेत्रेचा 6-2, 6-0 असा एकतर्फी पराभव करून विजयी आगेकूच केली.

-Ads-

तर, मुलींच्या गटात गुजरातच्या प्रियांका राणाने चौथ्या मानांकित दिल्लीच्या वामिका शर्माचा 6-4, 6-3 असा सहज पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. तसेच अन्य एका सामन्यात आठव्या मानांकित महाराष्ट्राच्या प्राप्ती पाटीलने आपली राज्य सहकारी आनंदी भुतडाचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आगेकूच नोंदवली. सहाव्या मानांकित उर्वी काटेने आकांक्षा अग्निहोत्रीचा 6-1, 6-2 असा स्रल सेटमध्ये पराभव केला. तर, उत्तरप्रदेशच्या तिसऱ्या मानांकित सौमित्रा वर्मा हिने महाराष्ट्राच्या चिन्मयी बागवेचा 6-3, 6-2 असा एकतर्फी पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

सविस्तर निकाल:
उप-उपांत्यपूर्व फेरी : 12 वर्षाखालील मुले: महालिंगम खांडवेल (तामिळनाडू) (1) वि.वि. अक्षज सुब्रमनियन (महा) 6-3, 6-0, वेदांत भासीन (महा) (7) वि.वि. केयूर म्हेत्रे (महा) 6-2, 6-0, व्रज गोहिल (गुजरात) वि.वि. क्रिश त्यागी (कर्नाटक) (4) 6-4, 6-2, चैत्रा गलीवेटी रेड्डी (तेलंगणा) (5) वि.वि. अथरिया हायगरेवा (तामिळनाडू) 6-4, 6-1, रूरिक रजीनी (कर्नाटक) (8) वि.वि. राघव अमीन (महा) 3-6, 6-4,7-5; श्री प्रणव तम्मा (कर्नाटक) (3) वि.वि. आदित्य राय (महा) 6-2, 6-2, अर्णव पापरकर (महा) (2) वि.वि. तन्मय देशपांडे (महा) 6-1, 6-0, समर्थ संहिता (महा) (6) वि.वि. अभिराम निलाखे (महा) 7-5, 6-4.

12वर्षाखालील मुली : इकराजू कनूमुरी (तेलंगणा) (1) वि.वि. साई सहस्रा सर्वदेवभटला (तेलंगणा) 6-2, 6-0, उर्वी काटे (महा) (6) वि.वि.आकांक्षा अग्निहोत्री (महा) 6-1, 6-2, प्रियांका राणा (गुजरात) वि.वि. वामिका शर्मा (दिल्ली) (4) 6-4, 6-3, आस्मि आडकर (महा) (5) वि.वि. थानिया गोगुलामांडा (तेलंगणा) 6-0, 6-2, जेनिका जैसन (महा) (7) वि.वि. आकृती सोनकुसरे (महा) 6-4, 6-1, सौमित्रा वमार्‌ (उत्तरप्रदेश) (3) वि.वि. चिन्मयी बागवे (महा) 6-3, 6-2, प्राप्ती पाटील (महा) (8) वि.वि. आनंदी भुतडा (महा) 6-3, 6-2, सोहिनी मोहंती (ओरिसा) (2) वि.वि. श्रेया देशपांडे (महा) 6-4, 6-3.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)