गुगल स्ट्रीट व्ह्यूला परवानगी नाही – हंसराज अहिर

नवी दिल्ली-प्रसिद्ध शहरे, पर्यटनस्थळे, पर्वत, नद्या आणि रस्ते यांचा 360 अंशामध्ये पॅनारोमिक पातळीवर चित्रांची माहिती देणाऱ्या गुगल स्ट्रीट व्ह्यूसाठी दाखल करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. यानुसार गुगलने जुलै 2015 मध्ये देशातील प्रसिद्ध शहरांमध्ये 360 अंशाच्या कॅमेराचा वापर करत डेटा गोळा करण्यात येणार होता. मात्र, या प्रस्तावाला सरकारकडून विरोध करण्यात आला अशी माहिती गृहराज्य मंत्री हंसराज गंगाराम अहिर यांनी लोकसभेत दिली.

देशातील प्रमुख स्थळांची माहिती गोळा करत ती ऑनलाइन जाहीर करण्याचा गुगलचा प्रयत्न होता. अमेरिका, कॅनडा आणि अनेक युरोपियन देशांमध्ये अशा प्रकारे माहिती गोळा करत ती ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात येते. प्रायोगिक पातळीवर गुगलकडून ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनार, वाराणसीचा नदीकाठ, नालंदा विद्यापीठ, म्हैसूर पॅलेस, तंजावर मंदिर, चिन्नास्वामी स्टेडियम यांचा डेटा 360 अंशात गोळा करण्यात आला होता. गुगल मॅप आणि गुगल अर्थवर या सेवेचा लाभ घेण्यात येतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)