“गुगल रिसर्च मेथडस्‌’वर परिसंवाद

पिंपरी – गुगल हे माहितीचा महासागर आहे. गुगल टूल्स शैक्षणिक कार्यात मोलाची भूमिका बजावत आहे. इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी गुगल हे एक वरदानच आहे, असे उद्‌गार पंजाबमधील एल. एम. थापर मॅनेजमेंट स्कूलचे प्राध्यापक डॉ. रुद्र रामेश्वर यांनी काढले.

आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ एमसीएच्या वतीने “इफेक्‍टिव्ह यूझ ऑफ़ गुगल टूल्स इन टीचिंग ऍण्ड रिसर्च मेथडस्‌’ या विषयावर आयोजित केलेल्या दोन दिवसीय परिसंवादाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक कर्नल (नि) एस. के जोशी, अधिष्ठाता डॉ. शलाका पारकर, एमसीए कॉलेजच्या संचालिका डॉ. के. निर्मला, डॉ. कविता सूर्यवंशी आदी उपस्थित होते. या परिसंवादात डेल्टा लॅबचे संचालक डॉ. वसंत बंग, मुंबईच्या जयश्री पारीख, राजस्थानमधील डॉ. अंजू सिंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मॅनेजमेंट सायन्सचे समन्वयक डॉ. मनिष वर्मा, कुणाल सर्पाल, भारती विद्यापीठाचे डॉ. ए. बी. राव, डॉ. हरिदास आचार्य, डॉ. अमोल मार्कले, डॉ. रोशन काझी, फ्लेम विद्यापीठाचे प्रा. होशियार माल यांनी गुगल टूल्सच्या विविध वापरावर मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)