गुगल मॅप्सवर व्हा ऍक्टिव्ह ! बना लोकल गाईड!

आजकाल प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन आहे आणि 100 पैकी 90 जणांकडे इंटरनेट 24 तास सुरू असते. त्यामुळे अनेकजण फेसबुक, व्हॉटसऍप, इन्स्टाग्राम आणि अन्यसोशल मीडिया साईटसवर एमेज असतात. मात्र, त्यतून नेहमीच सकारात्मक काही घडेल, असे नसते. अनेकदा तर अशा विविध पोस्टस वादाला आमंत्रण देणाऱ्या ठरतात. त्यापेक्षा आपण जर गुगल मॅप्सचे ऍप वापरत सातत्याने माहिती शेअर करत राहिलात, तर त्याचे फायदे अनेक आहे. गुगल मॅप्सवर माहिती सातत्याने अपडेट करणाऱ्याला “लोकल गाईड’ म्हणतात. हे सारे कसे चालते ते वाचा… 

-श्रीनिवास वारुंजीकर 

गुगल मॅप्स हे ऍप केवळ पत्ता शोधण्यासाठी नाही. तर त्या ऍपचे अनेक उपयोग आहेत. तुमच्या फोनमधले गुगल मॅप्सचे ऍप ओपन करा आणि टाईमलाईनवर क्‍लिक करा. त्यासाठी आधी तुमचे गुगलचे मेल आयडी लॉग-इन असणे गरजेचे आहे. या ऍपवर इथे तुम्हाला तुम्ही दिवसभर कोठे-कोठे गेलात, केव्हा गेलात, चालत की बाईकने की कारने, कुठे किती वेळ होता, याची एक टाईमलाईन दिसेल. या टाईमलाईनच्या खाली वेळेनुसार एक ठिकाणांची यादी दिसेल. अशा ठिकाणांना क्‍लिक करुन तुम्ही त्या ठिकाणाविषयीची अद्ययावत माहिती शेअर करु शकता. मग सुरु होते तुमचे स्वत:चे कॉन्ट्रीब्युशन! तुम्ही जी माहिती शेअर कराल, ती माहिती गुगल मॅप्सवर अपलोड होते आणि तुमच्या खात्यात काही पॉईंटस जमा होतात. हे पॉईंटस तुम्हाला अनेक ऑफर्ससाठी उपयोगी येतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माहिती आणि प्रश्‍नोत्तरे                                                                                                      समजा तुम्ही डेक्‍कन जिमाखान्यावरील एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि तुमच्या ग्रुपने/तुम्ही तिथे काही डिशेस घेतल्या, तर गुगल मॅप्स तुम्हाला प्रश्‍न विचारेल. त्या प्रश्‍नांची उत्तरे 1. हो, 2. नाही, 3. खात्री नाही या स्वरुपात द्यायची असतात. हे प्रश्‍न साधारण असे असतात…

1. हे हॉटेल पूर्ण शाकाहारी आहे का?

2. येथील पार्किंग फ्री आहे का?

3. व्हिलचेअरने जाता येऊ शकेल असे प्रवेशद्वार आहे का?

4. येथील डिशेस महाग आहेत का?

5. येथे 24 तास सेवा मिळते का?

या प्रश्‍नांची उत्तरे देत पॉईंटस ऍड करत जायचे 

फोटोज आणि व्हिडीओज 
समजा तुम्ही या हॉटेलमध्ये काही फोटोज काढले, तर ते फोटोज तुम्ही गुगल मॅपवर शेअर करु शकता. हे फोटो शेअर केल्यावरही तुमचे पॉईंट्‌स ऍड होतात. याच रेस्टॉरंटमध्ये तुम्ही काही व्हिडीओज शूट केले, कुणाची मुलाखत घेतली, तर असे व्हिडीओजही तुम्ही मॅप्सवर शेअर करु शकता. त्याचेही भरघोस पॉईंटस तुम्हाला मिळत जातात. जितके तुमचे फोटोज/व्हिडीओज मॅपचे ऍप वापरणारे युजर्स पाहतील, तितका विव्हर काऊंटरही प्रत्येक फोटो/व्होडीओसह दिसतो. त्यावरुन गुगल मॅप्स तुम्हाला “मास्टर फोटोग्राफर’सारख्या प्रमाणपत्राने गौरवते. तसेच अशा हॉटेलला रेटींग देत तुम्ही एखादा रिव्ह्यू पण लिहू शकता. त्यालाही पॉईंटस मिळतात.

चुकीच्या नोंदी 
काही वेळा असे होण्याची शक्‍यता असते की एखादे हॉटेल अथवा शॉप स्थलांतरित झालेले असते. मात्र गुगल मॅप्सवर त्याची जुनीच नोंद आढळत असते. अशा चुका तुम्ही गुगलच्या नजरेस आणून देवू शकता आणि “रिपोर्ट ऍन इश्‍यू’द्वारे असे बदल सुचवू शकता. एखादे दुकान कायमचे बंदच झाले असेल, इमारतच पाडली गेली असेल आणि तिथे नवीन काही विकसित झाले असेल, तर तीही माहिती तुम्ही मॅप्सला सांगू शकता. मात्र, या बदलांचे व्हेरिफिकेशन गुगल मॅप्स स्वत: करते आणि तुम्ही दिलेली नवी माहिती बरोबर असल्याची त्यांची खात्री पटली तर ही नवीन माहिती अपडेट करून गुगल तुम्हाला तुमच्या खात्यात आणखी पॉईंट्‌स देते.

माहितीची भर 
जर तुमच्या असे लक्षात आले की, एखादे ठिकाण गुगल मॅप्सवर दिसतच नाहीये, किंवा नव्याने डेव्हलप झाले आहे; जसे की मंदिर, टाऊनशिप किंवा मुव्ही थिएटर-मॉल, तर अशा ठिकाणाला पॉईंटरने मार्क करुन तुम्ही नवीन माहिती ऍड करू शकता. गुगल या माहितीची खातरजमा त्यांच्या पातळीवर करते आणि तुमची माहिती बरोबर असेल, तर ती माहिती सर्वांसाठी पब्लिश करते; तसेच त्याचे नोटीफिकेशन तुम्हाला येते. शिवाय ऍडिशनल पॉईंटस मिळतात, ते वेगळेच.

तुमच्या माहितीचा लेखाजोखा 
तुमच्या ऑफिसचा पत्ता, ऑफिसची वेळ आणि राहण्याचा पत्ता तुम्ही कायमस्वरुपी सेव्ह करुन ठेवू शकता. तुम्ही नेहमी करत असलेल्या विशिष्ट अंतराच्या प्रवासाची, वाहतुकीच्या स्थितीची माहिती याविषयी गुगल तुम्हाला दररोज आपणहून माहिती देते. महिन्याच्या शेवटी गुगल मॅप्सचे मेल तुम्हाला मिळते, ज्यामध्ये तुमच्या महिन्याभरातील प्रवासाचा लेखाजोखा असतो. तुम्ही किती ठिकाणांना भेटी दिल्या, किती नवीन ठिकाणी तुम्ही गेलात याची सविस्तर माहिती मिळते.

चौकशीला उत्तर 
एखाद्या ठिकाणाविषयी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून लोक तुम्हाला तुमच्या परिसरातल्या ठिकाणांविषयी माहिती विचारु शकतात. गुगलकडे येणारे असे प्रश्‍न त्या त्या एरियातील लोकल गाईडसना पोस्ट केले जातात. त्या प्रश्‍नाचे उत्तर तुम्ही दिल्यास तुम्हाला पॉईंटस अर्न करता येतात. उदाहरणार्थ – स्वारगेटवरुन बेंगळुरूला बस आहे का? किती वाजता? किंवा बालगंधर्व रंगमंदिराचे कार्यालय रविवारी सुरु असते का? अशा प्रश्‍नांची अचूक उत्तरे माहिती घेऊन तुम्ही उत्तरे देवू शकता. तसेच तुमच्या परिसरातल्या अशा लोकल गाईडसचे गेट टुगेदरही तुम्ही आयोजित करुन त्याच्या पोस्टस लोकल गाईडस कम्युनिटीवर अपलोड करु शकता.

पॉईंटस मिळवून फायदा काय?                                                                                              असे केले तर इतके पॉईंटस, तसे केले तर तितके पॉईंटस, पण हे पॉईंटस घेऊन करायचे तरी काय, असा प्रश्‍न पडणे साहजिक आहे. असे पॉईंटस मिळवून तुम्ही लोकल गाईडसमध्ये एकेक स्टार मिळवत पुढे जात राहता. विशिष्ट मर्यादा ओलांडल्यानंतर तुम्हाला हॉटेल, बससेवेत डिस्काऊंटस मिळू शकतात. तसेच अनेकदा 50 जीबी, 100 जीबी ते अगदी 2 टीबीपर्यंत व्हर्च्युअल मेमरी एका वर्षासाठी मोफत वापरायला मिळते. गिगल प्ले स्टोअरवरती तुम्हाला कॅश व्हाऊचर्स मिळतात, जेणेकरुन पेड ऍप्स डाऊनलोड करताना ही रक्‍कम रिडीम करता येते. अशा ऑफर्स सतत सुरू असतात.

गुगल लोकल गाईडस समिट 
लोकल गाईडस म्हणून उल्लेखनीय पातळीवर पोहोचलेल्या सदस्यांना प्रतीवर्षी गुगलच्या अमेरिकेतील मुख्यालयात “लोकल गाईडस समिट’ या तीन दिवसीय अधिवेशनात सहभागी व्हायची संधी जगभरातील 150 जणांना मिळते. त्यासाठी विमान तिकिटासह व्हिसा फिज आणि अमेरिकेतील तीन दिवसांच्या सर्व पाहुणचाराचा खर्च गुगलकडून केला जातो. त्यासाठी लोकल गाईड कम्युनिटीवर अपडेटस येत असतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)