गुगल नोकरी शोधण्यासाठी मदत करणार

मुंबई – माहिती शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोगात येणारे आपण गुगल सर्च इंजिन आता नोकरीच्या शेधासाठीही उपयोगी पडणार आहे. खास भारतीय तरुणांसाठी गुगलने हे जॉब सर्च इंजिन आणले आहे.

स्मार्ट फोनमुळे गुगल प्रत्येकाची गरज झाले आहे. हवी ती माहिती काही सेकंदात गुगलद्वारे उपलब्ध होते. याच गुगलवर आता नोकरीची माहिती शोधता येते. गुगलच्या टूल बारमध्ये गुगल जॉब्स असा सर्च देताच नोकरीचे अनेक पर्याय दिसतात. अकाऊंटंटपासून ते व्यवस्थापक, डिजिटल मार्केटिंग, सीनिअर ऍनालिस्ट्‌स, क्‍लाऊड सल्लागार, भागीदार, व्यावसायिक, सॉफ्टवेअर या 21 श्रेणीतील नोकऱ्या गूगलने उपलब्ध केल्या आहेत.

आपण राहत असलेल्या ठिकाणापासून विशिष्ट अंतरावरील नोकरी शोधण्यासाठी स्वतंत्र पर्याय आहेत. तसेच देशभरात हव्या त्या ठिकाणच्या नोकरीचा शोधही घेता येतो. नोकरीचा प्रकार, कंपनी, मालक या पर्यायांद्वारेही नोकरी शोधता येते. 2020 पर्यंत भारत जगातील सर्वात तरुण देश होत आहे. तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुगलने ही सेवा सुरू केली आहे. त्यासाठी लिंक्‍डइन, क्विकआर जॉब्स, शाइन डॉट कॉम, मायजॉब्स डॉट कॉम या कंपन्यांकडील नोकरीची माहिती गुगलशी संलग्न केली आहे.

गुगलवर जॉब सर्च करताच या अन्य वेबसाइटवरील नोकरीच्या संधी युझर्सला एकाच ठिकाणी पाहता येतात. त्यासाठी त्या-त्या वेबसाइटावर जाण्याची गरज नाही, हे या सेवेचे प्रमुख वैशिष्ट्य्‌ आहे. यात आवडलेली नोकरी इच्छुकाला स्वत:साठी सेव्ह करता येते, हव्या असलेल्या नोकरीसाठी अलर्ट लावता येतो, नोकरी ज्या वेबसाइटवर आली आहे, त्यावर थेट अर्ज करता येतो, अर्ज गुगल लॉग इनद्वारेच, स्वतंत्र खाते उघडण्याची गरज नाही, नोकरीची माहिती अर्जासह फेसबुक, ई-मेल, ट्विटरवर पाठवता येते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)