गुगल ट्रान्सलेट : भाषांतराचा चमत्कारी आविष्कार

भाषा हा मानवी जीवनाचा अविभाज्य असा घटक आहे. भाषेशिवाय माणूस एकमेकांशी संवाद साधू शकत नाही. त्यातच वैज्ञानिक व संगणकीय क्रांतीच्या जोरावर जग एक छोटीशी गल्ली झाले आहे. जगातील ह्या टोकापासून त्या टोकापर्यंतची सर्व माणसे क्षणोक्षणी एकमेकांशी संवाद साधत असतात. अशावेळी वेगवेगळ्या भाषा हा संवादातील सर्वात मोठा अडसर ठरत असतो. भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात तर दर 16 मैलाला भाषा बदलते असे म्हणतात. यासाठी पुरातन काळापासून अनेक भाषा जाणणाऱ्या दुभाषिक व्यक्तीची नेमणूक केली जात असे. परंतु आता ‘गूगल ट्रान्सलेट’ हे गुगलने तयार केलेले नवीन अॅप या वरती रामबाण औषध ठरले आहे.

गूगल ट्रान्सलेटमध्ये 100 भाषांचा वापर केला जात असून त्यामध्ये 37 भाषांचे भाषांतर केले जाऊ शकते. भारतातील मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, हिंदी व बंगाली या भाषांचा गुगल ट्रान्सलेटमध्ये समावेश केलेला आहे. यामध्ये आपण बोलायची भाषा निवडून आपल्याला हवे असलेल्या भाषांतराची भाषा निवडली की आपण बोललेले किंवा लिहिलेले संवाद क्षणात आपल्याला हवे त्या भाषेमध्ये रूपांतरित करता येतात. शिवाय भाषा रूपांतरित करण्यासाठी वेगवेगळ्या पाच प्रकारच्या पर्यायांचा अवलंब करता येतो.

– आपण कोणत्याही भाषेमध्ये टाईप केलेले लेखन गुगल ट्रान्सलेटमध्ये कॉपी-पेस्ट केल्यावर आपल्याला पाहिजे त्या भाषेतून भाषांतरित झालेले लेखन आपल्याला क्षणात उपलब्ध होते.
– जर आपल्याला छापील माहितीचे भाषांतर करायचे असेल तर आपण मोबाईल कॅमेऱ्याने आवश्‍यक असलेले लेखन स्कॅन केले की त्या भाषेचे आपल्याला आवश्‍यक त्या भाषेमध्ये क्षणांमध्ये भाषांतर करता येते.
– मोबाईल स्क्रीनचा वापर करून आपल्याला येत असलेली भाषा आपण हॅन्डरायटिंग पद्धतीने स्क्रीनवर लिहिल्यास आपल्याला आवश्‍यक त्या भाषेमध्ये भाषा निवडून भाषेचे रूपांतर करता येते.
– चौथा प्रकार आहे बोलून आपल्या भाषेतील वाक्‍यांचे दुसऱ्या भाषेत रूपांतरण करणे. यामध्ये संभाषणाचा पर्याय उपलब्ध असून आपण जी भाषा बोलू त्या भाषेतून आवश्‍यक त्या भाषेमध्ये लेखी स्वरूपात आपल्याला भाषांतर करून घेता येते.
– या प्रकारांमध्ये आपण बोललेल्या संभाषणाचे आपल्याला आवाजी स्वरूपात भाषांतर करता येते. जसे लोकसभेमध्ये बोलणारे सांसद स्वतःच्या भाषेतून बोलतात पण ऐकणारा सांसद स्वतःची भाषा निवडून ते भाषण ऐकू शकतो. ही क्रिया इन्स्टंट म्हणजेच त्यावेळेस घडून संभाषण सहज व सुलभ होते. भाषांतराचा चौथा पर्याय आहे आपण बोललेल्या संवादाचे आपल्याला हवे त्या भाषेत लेखी रूपांतर करणे.

– दत्तात्रय शिंदे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
12 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)