गुगल आणि पेटीएम फ्युचर रिटेलमध्ये गुंतवणूक करणार

नवी दिल्ली: फ्युचर रिटेल कंपनीत सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वाखालील गुगल आणि पेटीएम मॉल गुंतवणूक करण्याची शक्‍यता काही वृत्त माध्यमांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आज फ्युचर रिटेल कंपनीचे शेअर 5 टक्‍क्‍यांनी वाढले.
पेटीएम, मॉल आणि गुगल या शेअर खरेदीसाठी एकत्रीत प्रयत्न करीत असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिल्यानंतर शेअर बाजारांनीही फ्यूचर रिटेल कंपनीच्या व्यवस्थापनाकडे स्पष्टीकरण मागिलते. फ्युचर रिटेलने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे, की कंपन्या भांडवल उभारणीसाठी विविध स्तरावर निरंतर प्रयत्न करीत असतात.

त्या अनुषंगाने काही वृत्त माध्यामातून तसे वृत्त आलेले असू शकते. काही कंपन्या तशी गुंतवणूक करण्याची शक्‍यता असली तरी फ्युचर रिटेलच्या व्यवस्थापनाने त्यावर काही निर्णय घेतलेला नाही. जर काही निर्णय घेण्याची शक्‍यता असली किंवा निर्णय घेतला तर शेअर बाजाराना कळविण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)