गुगलला मागे टाकत ऍपल सर्वोच्च ब्रॅंड 

सॅन फ्रान्सिस्को: जागतिक ब्रॅंड कन्सल्टन्सी इंटर ब्रॅंड यांच्याकडून बेस्ट-100 ग्लोबल ब्रॅंड 2018 फ यादी तयार सादर करण्यात आली. यात गुगल या प्रसिद्ध आणि सर्व परिचित असणाऱ्या ब्रॅंडला मागे टाकत ऍपलने जागतिक टॉपचा ब्रॅंड होण्याचा मान पटकावला आहे. ऍमेझॉन कंपनी आपल्या कार्याची घोडदौड 56 टक्‍क्‍यांच्या वाढी नोंदवत जगातील तिसऱ्या क्रमाकांचा ब्रॅंड झाला आहे. मागील वर्षातील यादीत यांची स्थान 5 व्या क्रमांकावर होते.

मागील काही दिवसापासून डेटा चोरीच्या प्रकरणामुळे चर्चेत राहिलेल्या फेसबुक 8 क्रमांकावरून 9 स्थानावर पोहोचला असल्याची माहिती सादर करण्यात आलेल्या सूचित नोंद करण्यात आली. गुगल ब्रॅंडची व्हॅल्यू 10 टक्‍क्‍यांनी वधारली असल्याचे यात म्हटले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या क्रमांकांवर गुगलची व्हॅल्यू 10 टक्‍क्‍यांसह 155.5 अब्ज डॉलर (11.23 लाख कोटी रुपये) झाली आहे. 2017 मध्ये कंपनीची ब्रॅंड व्हॅल्यू (10.4 लाख कोटी रुपये) पर्यत राहिली आहे. 100.8 अब्ज डॉलर (7.37 लाख कोटी रुपये) इतक्‍या व्हॅल्यू बरोबर ऍमेझॉन तिसऱ्या स्थानावर आहे. मागील वर्षात यांची ब्रॅंड व्हॅल्यू 64.7 अब्ज डॉलर (4.77 लाख कोटी रुपये) राहिली होती. मायक्रोसॉफ्ट कंपनी ब्रॅंड व्हॅल्यूमध्ये चौथ्या क्रमाकांवर राहिला असून ब्रॅंड व्हॅल्यू 2017 मध्ये 79.9 अब्ज डॉलर (5.89 लाख कोटी रुपये) होता. तो वाढत जात 92.7 अब्ज डॉलर (6.84 लाख कोटी रुपये) पर्यत आले होते. तर पाचव्या क्रमाकांवर कोका कोला पोहोचला आहे. असून 66.3 अब्ज डॉलर(4.89 लाख कोटी रुपये) ब्रॅंड व्हॅल्यू नोंदवण्यात आली आहे. आणि सॅमसंग 59.8 अब्ज डॉलर(4.41 लाख कोटी रुपये) सह सहाव्या क्रमाक गाठला आहे.

सर्व ब्रॅंडने आपल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करत आपली बाजारातील व्हॅल्यू कायम ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती इंटरब्रॅंडचे जागतिक प्रमुख चार्ल्स यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)