गुगलच होणार आता तुमचा नेबर…!

जगभरातील तरुणाईमध्ये सध्या टेक्‍नॉलॉजी बाबत भयंकर क्रेझ आहे. शॉपिंग, हॉटेलिंग, मुव्ही तिकीट, बॅंकिंग असे जवळ जवळ सगळेच डेली टास्क आता ऑनलाईन झाले असल्याने आजची तरुण पिढी सर्व कामे घरबसल्या स्मार्टली करताना दिसत आहे. आता टेक्‍नॉलॉजीचा हा अनुभव आणखीन पर्सनलाईझ करण्यासाठी गुगल एक खास अॅप लॉंच करणार आहे.

गुगलद्वारे या नव्या अॅपचे नाव ‘नेबरली’ असे ठेवण्यात आले असून, या अॅपद्वारे तुम्हाला तुमच्या परिसराबाबत माहिती मिळणार आहे. या अॅपची बेसिक कंसेप्ट तुमच्या परिसराबाबत तुमच्या प्रश्‍नांना उत्तरे देणे ही असून या अॅपद्वारे तुम्ही इतरांना प्रश्‍न विचारू शकता अथवा इतरांच्या प्रश्‍नांची उत्तरे देखील देऊ शकता. उदाहरणार्थ जर तुम्हाला पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये मॉर्निंग वॉकसाठी सर्वोत्तम गार्डन कोणते आहे? असा प्रश्‍न पडला असेल तर तुम्ही या अॅपद्वारे ‘अस्क ए क्वेशन’ हा पर्याय वापरून तुमच्या परिसरातील या अॅपच्या वापरकर्त्यांकडून उत्तर मिळवू शकते. तसेच जर तुमच्याकडे इतरांच्या प्रश्‍नाला उत्तर द्यायचे असेल तर उत्तर देण्याच्या पर्यायाद्वारे तुम्ही उत्तर देऊ शकता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुगलचे हे अॅप काही प्रमाणामध्ये क्वारा या वेबसाईट प्रमाणेच ‘यूजर ओपिनियन’ आधारित असले तरी या अॅपची खासियत म्हणजे या ऍपद्वारे मिळणारी उत्तरे ही स्पेसिफिक लोकेशनमध्ये राहणाऱ्या लोकांकडून मिळणार आहेत.

– प्रशांत शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)