गुगलच्या चुकीमुळेच मोबाईलध्ये ‘UIDAI’चा नंबर

मुंबई – देशभरातल्या ऍन्ड्रॉईड मोबाईलध्ये शुक्रवारी अचानकपणे सेव्ह झालेला UIDAIचा टोल फ्री क्रमांक ही गुगलची चूक असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत गुगलने स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. त्यामुळे UIDAIचा नंबर सेव्ह होणे हा सायबर हल्ला नसून गुगलची चूक आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.

देशभरातल्या ऍन्ड्रॉईड मोबाईलमध्ये काल (3 ऑगस्ट) आधारचा नंबर सेव्ह झाल्यानंतर मोठा गदारोळ झाला. त्यानंतर UIDAI ने आपण याबाबत कोणतेही आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले. पण आता गुगलने आमच्याच चुकीमुळे हा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह झाल्याचे मान्य केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यूआयडीएआय आणि इतर 112 हेल्पलाईन नंबर ऍन्ड्रॉईडच्या सेटअपमध्ये 2014 साली कोड करण्यात आले होते, अशी माहिती आमच्या इंटरनल सर्व्हेत समोर आली आहे. हा नंबर एकदा ग्राहकांच्या कॉन्टॅक्‍ट लिस्टमध्ये आला की डिव्हाईस बदलल्यानंतरही हा नंबर पुन्हा नव्या डिव्हाईसमध्ये सेव्ह होतो. लोकांना यामुळे त्रास झाला याबाबत आम्हाला खेद आहे, असे म्हणत या सर्व प्रकरणावर गुगलने माफी मागितली आहे.

तुमचा मोबाईल हॅक झाला नाही. UIDAIचा सेव्ह झालेला नंबर तुम्ही डिलीट करु शकता. आम्ही नवीन ऍन्ड्रॉईड सेटअपमध्ये हा नंबर येऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे गुगलने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)