गुगलचा अजब प्रताप : नाव नेहरूंचे फोटो मोदींचा

नवी दिल्ली :  भारताचे पहिले पंतप्रधान कोण? असे सर्च केल्यावर जवाहरलाल नेहरुंचे नाव तर येतं आहे पण फोटो मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा येतो आहे. गुगलवर मिळणाऱ्या या उत्तराचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेतला जातो आहे.

गुगलच्या या चुकीचे नेटीझन्सकडून स्क्रीनशऑट शेअर करून ट्रोल केले जातं आहे. गुगल इंडियाला याविषयीचे प्रश्नही विचारले आहेत. तर हा ‘गुगल एरर’ आहे असं म्हणत काहींनी थट्टाही केली. गुगलची ही चूक काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना यांनीही ट्विट करत लक्षात आणून दिली आहे. दरम्यान, गुगलने ही चूक दुरुस्त केली असून आज सकाळपासून साइटवर नेहरुंचाच फोटो दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)