#गुंतवणूक मंत्र: भारतीय अर्थव्यवस्थेतील घोडदौड आपल्यापर्यंत कशी पोचेल ?

भारतीय अर्थव्यवस्था जगात सहाव्या क्रमांकाची झाली आहे, याचा अर्थ भारताचा आर्थिक विकास तर होतो आहे. त्या विकासाची फळे आपल्या गुंतवणुकीपर्यंत पोचविण्याचा म्युच्युअल फंड हा सर्वात चांगला मार्ग आहे.

जागतिक बॅंकेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत सहाव्या क्रमांकावर पोचली आहे. भारतीय जीडीपी (ग्रोस डोमेस्टिक प्रॉडक्‍शन) – 2.597 ट्रिलियन डॉलरची झाली आहे.

देशातील सरकारने अनेक विविध संकल्पनांद्वारे गेल्या काही वर्षात ज्या योजना राबवल्या त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. अनेक महिने कमी प्रमाणात वाढणारी आपली अर्थव्यवस्था सध्या वेगाने प्रगतीपथावर आहे. देशाची आर्थिक पुनर्बांधणी होताना दिसत आहे. भली मोठी लोकसंख्या असणाऱा भारत देश अजूनही दरडोई उत्पन्नामध्ये मात्र फ्रान्सपेक्षा खूपच मागे आहे. भारताची लोकसंख्या 135 कोटी आहे तर फ्रान्सची लोकसंख्या फक्त 6.9 कोटी आहे. उत्पादन क्षमता व ग्राहक खर्च या दोन महत्त्वाच्या बाबी भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीस उपयुक्त ठरत आहेत. भारतीय अर्थव्यवस्था नोटाबंदी व जीएसटी लागू झाल्यानंतर काही काळ संथ झाली होती. परंतु गेल्या वर्षात दुप्पट वेगाने अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. याच काळात चीनची अर्थव्यवस्था संथ झाली आहे. सर्व उदयोन्मुख अर्थव्यवस्था थंडावल्या असताना भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरुच आहे.

आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या म्हणण्यानुसार भारतीय अर्थव्यवस्था 2018 मध्ये 7.4 टक्के तर 2019 मध्ये 7.8 टक्के या वेगाने वाढण्याचे अनुमान केले आहे. याच काळात जगातील सर्व देशांची सरासरी वाढ ही फक्त 3.9 टक्के असण्याचे अनुमान आहे. लंडनस्थित सेंटर फॉर इकॉनॉमिक्‍स अँड बिझनेस रिसर्च या संस्थेच्या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्था या वर्षी ब्रिटीश अर्थव्यवस्थेला मागे टाकत पुढे जाण्याची चिन्हे आहेत.

या वाढीचा फायदा अर्थातच संघटित क्षेत्र जास्त घेणार आहे. याचा अर्थ शेअर बाजारात नोंद असलेल्या नावाजलेल्या कंपन्यांच्या परिस्थितीचा अधिक फायदा मिळतो आहे. त्या कंपन्यांचा फायदा आपल्यापर्यंत पोचविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या कंपन्यांचे भागीदार होणे. पण थेट शेअर बाजारात गुंतवणूक करणे आपल्याला जोखीमीचे वाटते आणि ते बरोबरच आहे. पण मग वेगळा काही मार्ग आहे काय, याचा शोध घेतल्यास म्युच्युअल फंड हाच मार्ग समोर येतो.
भारताचा आर्थिक विकास होतो आहे, हे नाकारून तर चालणार नाही. पण हा विकास आपल्या गुंतवणुकीपर्यंत पोचण्यासाठी आपण म्युच्युअल फंडाच्या मार्गाने त्याचे भागीदार झाले पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)