गुंतवणूक छोटी; कमाई मोठी ! (भाग-२)

स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी प्रॉपर्टी विकत घ्यावी लागते आणि त्यासाठी मोठी रक्कम लागते; परंतु आरईआयटी ट्रस्ट स्थापन होण्याची शक्‍यता वाढल्यामुळे आता म्युच्युअल फंडाच्या धर्तीवर प्रॉपर्टीत गुंतवणूक करणे छोट्या गुंतवणूकदारांना शक्‍य होणार आहे. तयार प्रॉपर्टीच्या मूल्याचे युनिट्‌स करून शेअर बाजारात त्यांची विक्री शेअर्सप्रमाणेच करण्यात येणार असून, अशा प्रकारच्या गुंतवणुकीतून छोट्या गुंतवणूकदारांना कमी पैशात अधिक परतावा मिळविण्याची संधी प्राप्त होणार आहे.

गुंतवणूक छोटी; कमाई मोठी ! (भाग-१)

आरईआयटीमध्ये गुंतवणूक करताना थोडी सावधगिरी बाळगणेही गरजेचे मानले जात आहे. मूल्य निर्धारणाची अनुमती आरईआयटी गुंतवणूकदारांना देत नाही. कारण गुंतवणूक सार्वजनिक स्वरूपात केली जात नाही. म्हणजेच, आपण खरेदी केलेल्या युनिट्‌सच्या माध्यमातून कोणत्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली जात आहे आणि भविष्यात त्याचा लाभ किती असेल, हे गुंतवणूकदारांना समजू शकणार नाही. अनेक आरईआयटी कंपन्या गुंतवणूक केल्यानंतर अनेक वर्षांनी गुंतवणूक केलेल्या प्रॉपर्टीच्या मूल्याचा खुलासा करतील. त्यात केलेली गुंतवणूक बाजारातील चढउतारांशीही संबंधित असू शकते. हा निधी शेअर बाजारात सूचिबद्ध असणार म्हणजे बाजारातील जोखिमेशीही त्याचा संबंध असणारच. अशा स्थितीत चांगला परतावा देण्यात फंड मॅनेजरची भूमिका महत्त्वाची ठरेल. हे मॅनेजरच बाजारात कुठे पैसा लावावा, याची माहिती गुंतवणूकदारांना देतात.

एकंदरीत रिअल इस्टेट बाजारात म्युच्युअल फंडांच्या धर्तीवरच ही गुंतवणुकीची संधी आहे. बाजारात या युनिट्‌सची खरेदी-विक्री शेअर्सच्याच धर्तीवर केली जाणार आहे. गुंतवणूकदाराला प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्यासाठी संपूर्ण प्रॉपर्टी खरेदी करण्याची गरज उरणार नाही. गुंतवणूकदार यातील पैसा पाहिजे तेव्हा काढून घेऊ शकतील. प्रॉपर्टी खरेदी करताना जी मोठी कागदोपत्री प्रक्रिया करावी लागते, ती आरईआयटी अंतर्गत गुंतवणूक करताना करावी लागणार नाही. त्याचप्रमाणे गुंतवणुकीवरील जोखीम कमी असेल. त्यामुळे या गुंतवणुकीचे जोखमीपेक्षा फायदे अधिक असून ट्रस्टच्या स्थापनेनंतर रिअल इस्टेटमध्ये सामान्य छोट्या गुंतवणूकदारांची भागीदारी वाढण्याची चिन्हे आहेत. हा ट्रस्ट व्यावसायिक स्वरूपात चालविला जाणार असून, त्यामुळे फसवणुकीची शक्‍यता कमी असेल.

अर्थात, ही गुंतवणूकही हुशारीने करायला हवी. जेव्हा बॅंकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर वाढतील, तेव्हा आरईआयटीमधील गुंतवणूक ठेवावी की काढून घ्यावी, याचा विचार गुंतवणूकदारांना करावा लागेल. त्याचप्रमाणे किरकोळ बाजारात जेव्हा तेजी येईल, तेव्हा गुंतवणूक वाढविली पाहिजे. कारण या फंडातील 90 टक्के रक्कम तयार इमारतींमध्येच गुंतविली जाणार आहे. बाजारात जेव्हा भाड्यापोटी मिळणारी रक्कम जास्त असते आणि त्यातून होणाऱ्या उत्पन्नात वाढ होते, तेव्हा या क्षेत्रात पैसे गुंतविणाऱ्यांना सर्वाधिक परतावा मिळणार आहे. या गोष्टी लक्षात घेऊन गुंतवणुकीची वेळही विचारपूर्वक ठरवायला हवी.

– कमलेश गिरी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)