गुंतवणूक करण्यास उशीर केला तर उद्दीष्ट गाठणे कठीण…(भाग-२)

गुंतवणूकदार आपल्या उद्दीष्टानुसार गुंतवणुकीचे नियोजन करतात परंतु गुंतवणूक करण्यास विविध कारणांमुळे विलंब होते. असा विलंब उद्दीष्ट गाठण्यासाठी जादाची रक्कम खिशातून घेऊन जातो.

गुंतवणूक करण्यास उशीर केला तर उद्दीष्ट गाठणे कठीण…(भाग-१)

निवृत्तीच्या उद्दीष्टांसाठीदेखील लवकरात लवकर गुंतवणुकीस सुरवात करणे आवश्यक आहे. आपण एक उदाहरण पाहू. श्रीराम यांचे वय तीस वर्षे आहे आणि ते सध्या खासगी संस्थेत कामाला आहेत. त्यांना वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे आणि त्यासाठी रु. तीन कोटींचे जमा करण्याचे त्यांचे उद्दीष्ट आहे. यासाठी श्रीराम यांना दरमहिना रु. ९,७३७ गुंतवणे आवश्यक आहे. जेणेकरून वयाच्या साठाव्या वर्षी त्यांच्या हाती अपेक्षित रक्कम पडेल. श्रीराम यांना पुढील काळात (तीस वर्षे गुणिले बारा महिने म्हणजे ३६० महिने) प्रतिमाह ९,७३७ रुपयांप्रमाणे जमा होणारी रक्कम रू. ३५,०५,३२० एवढी असणार आहे. यावर १२ टक्के चक्रवाढ व्याजाने वाढणारी एकूण रक्कम रु. ३ कोटी एवढी होणार आहे. या गुंतवणुकीमध्ये श्रीराम यांना नफा म्हणून २,६४,९४,६८० असा होणार आहे.

जर ही गुंतवणूक श्रीराम यांनी दहा वर्षे उशीरा म्हणजेच वयाच्या चाळीसाव्या वर्षी सुरु केली तर त्यांच्या हाती केवळ (वीस वर्षे गुणिले बारा महिने म्हणजे २४० महिने) २४० महिने उपलब्ध आहेत. याच काळात वर ठरवल्याप्रमाणे त्यांनी दरमहा रू. ९,७३७ एवढी रक्कम २४० महिने गुंतवली असता वयाच्या ६० व्या वर्षी त्यांच्या खात्यात जमा होणारी रक्कम १२ टक्के चक्रवाढ व्याजाने रू. ८९,५०,००० एवढीच असणार आहे. म्हणजेच सदर रक्कम तीन कोटीपेक्षा जवळपास २,०१,५०,००० कमी जमा होणार आहे.

वरील उदाहरणात असे दिसून येते की, गुंतवणुकीच्या उद्दीष्टांसाठी योग्य नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने केल्यास उद्दीष्ट गाठणे सहजशक्य होते. परंतु यासाठी गुंतवणुकीतील विलंब निश्चितच टाळायला हवा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)