गुंतवणूकदार झाले चिंताग्रस्त; अर्थमंत्रालय व आरबीआयचे संबंध सुरळीत होण्याची गरज

नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंक आणि अर्थमंत्रालयादरम्यान गेल्या काही महिन्यापासून अनेक मुद्द्यावर चालू असलेले शीतयुद्ध आता भडकण्याची काही लक्षणे दिसत आहेत. यामुळे गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले आहेत. यातून सामोपचाराने मार्ग निघण्याची गरज असल्याचे गुंतवणूकदार बोलून दाखवित आहेत. कायद्यानुसार सरकार रिझर्व्ह बॅंकेसंबंधात कोणताही निर्णय घेऊ शकते, असे सरकारने बॅंकेला त्या कायद्याचा हवाला देऊन सांगितले आहे. त्यामुळे सरकारने ब्रह्मास्त्राचा वापरही केला जाऊ शकतो असे सूचित केले आहे.

मुळात बॅंकाची अनुत्पादक मालमत्ता वाढल्यानंतर ती कमी करण्यासाठी सरकारने आणि बॅंकेने प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी सरकारने नादारी कायदा केला होता. त्याचबरोबर बॅंकेने काही सरकारी बॅंकांच्या कर्ज वितरणावर मर्यादा आणल्या आहेत. कर्ज वसुली मोहीम यशस्वी केल्यानंतरच त्यांना विस्ताराला परवानगी देण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने सांगितले आहे. त्याचा परिणाम कर्ज वितरणावर आणि उद्योगांच्या उत्पादकतेवर होत आहे. हे नियम शिथिल करावे, असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र रिझर्व्ह बॅंकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्र सरकारने आपल्या अधिकारात बॅंकेच्या संचालक मंडळावर दोन संचालकांची नियुक्ती केली होती. त्यावेळी बॅंकेला फारसे विचारात घेतले गेले नसल्याचे बोलले जात आहे.

त्यातच सरकारने पेमेंट बॅंक ही नवी संकल्पना असल्यामुळे त्यासाठी वेगळा नियंत्रक असण्याची गरज असल्याचे रिझर्व्ह बॅंकेला सुचविले होते. मात्र त्याकडे बॅंकेने दुर्लक्ष केले. या सर्व घटनाक्रमांनतर सरकारने ताठर होऊन संबंधित कायद्याचा हवाला देऊन बॅंकेला चर्चा करण्याची गरज असल्याचे सांगितले होते. त्यानंतर बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विराल आचार्य यांनी बॅंकेची स्वायत्तता कमी झाली तर अर्थव्यवस्थेचे नुकासान होईल असे सांगितले होते. आचार्य यांच्या वक्तव्यानंतर अर्थमंत्री अरूण जेटली यानी एनपीए वाढीसाठी रिझर्व्ह बॅंकच जबाबदार असल्याचे काल सांगितले होते. त्यानंतर सरकार आणि बॅंकेदरम्यान मतभेद वाढले असल्याचे वातावरण तयार झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)