गुंतवणुकीच्या आमिषाने 22 लाख रुपयांना गंडा

पिंपरी – शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखून तब्बल 22 लाख 10 हजार 329 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार वाकड परिसरात घडला. याप्रकरणी एकजणाला पोलिसांनी अटक केली आहे.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षनीत पल्लव सुनील कुमार दुबे उर्फ हर्षनीत भारद्वाज (वय-26, रा. प्रभात कॉलनी, शंकर कलाटे नगर, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हर्षनीत याने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास तुमचा फायदा करुन देतो. चांगला परतावा मिळवून देतो, असे सांगून फिर्यादी प्रसाद वाघमारे यांच्यासह तिघांकडून सन 2015 ते 2017 दरम्यान वेळोवेळी पैसे घेतले. तसेच, पटणा येथे हॉटेल, पेट्रोल पंप आणि बांधकाम व्यावसाय असल्याचेही त्याने संबंधितांना सांगितले. मात्र, वेळोवेळी गुंतवलेली रक्‍कम परत न करता फसवणूक केले. त्यामुळे फिर्यादींनी पोलिसांत धाव घेतली.

हर्षनीत यांनी फिर्यादी यांचा विश्‍वास संपादन करुन वेळोवेळी 6 लाख 46 हजार 833 रुपये व 5 लाख 23 हजार 496 रुपये, मार्शन बावतीस गोंडद यांच्याकडून 6 लाख, राहुल सोमनाथ गायकवाड यांच्याकडून 2 लाख 70 हजार आणि ज्ञानेश्‍वर निर्मळ यांच्याकडून 1 लाख 70 हजार रुपये असे एकूण 22 लाख 120 हजार 329 रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक एम. एल. जाधव तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)