गुंड तडीपार; निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी

पुणे – सराईत गुंड महेंद्र ऊर्फ वास्को रामचंद्र कांबळे (वय-35, रा. लोहियानगर) याला पुणे शहर व जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. त्याच्याविरूद्ध खडक पोलीस ठाण्यात मारामारी, घातक हत्यारे जवळ बाळगणे, घरात घुसून मारहाण करणे, असे तीन व स्वारगेट पोलीस ठाण्यात जमाव जमवून घातक शस्त्रानिशी मारहाण करणे, असा एक गुन्हा दाखल आहे.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गुन्हेगारांवर ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. वास्को याच्यावर वेळोवेळी कारवाई करूनही, त्याच्यात काहीएक फरक पडला नव्हता. तो अत्यंत क्रूर, खुनशी, भांडखोर असून कुरापती काढून मारहाण करुन गुन्हे करत आहे. त्याच्या दहशतीमुळे त्याच्याविरुध्द तक्रार करण्यास कोणीही पुढे येत नव्हते. यामुळे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्याकडे त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी त्यास शहर व जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षाकरीता तडीपार केले असल्याची माहिती खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली. यासाठी फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे, पोलीस कर्मचारी महेश बारवकर, महेश कांबळे, दीपक मोघे यांनी कारवाईत सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)