गुंडाला भेटत नसल्याने मारहाण; दोघांना पोलीस कोठडी

पुणे- गुंडाला भेटायला न्यायालयात जात नसल्याच्या कारणावरून गंभीर मारहाण करणाऱ्या दोघांना खडक पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
सागर धनाजी थोरात (29, रा. बाबु मामडी चौक, लोहियानगर) आणि महेंद्र रामचंद्र कांबळे (34, रा. लोहियानगर) अशी पोलीस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत संगीता संतोष महापात्रा (40, रा. एकबोटे कॉलनी, घोरपडी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
लोहियानगर भागातील जंगल्या टोळीतील कारागृहात असेला गुंड शंकर कोळी याला फिर्यादींचा मुलगा रितेश हा न्यायालयात तारखेच्या वेळी भेटण्यासाठी जात नसल्याच्या आणि साथीदारांची संबंध ठेवत नसल्याच्या कारणावरून बांबूने तसेच दगडाने मारहाण करून कोयता दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दि. 10 जून 2018 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घोरपडी पेठ येथील एकबोटे कॉलनी येथे हा प्रकार घडला. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)