गुंजाळवाडीत रंगला कुस्तीचा आखाडा

बेल्हे- हलगीचा कडकडाट, चढत्या क्रमाने लागणारी मल्लावरची बोली, शत प्रतिशत डावपेज टाकून विजयश्री खेचणारे मल्ल, काळजाचे ठोके चुकवयाला लावणारे क्षणा क्षणांचे प्रसंग, रसिकांचा शिगेला पोहचलेला उत्साह अशा विविध नेत्रदीपक प्रसंगांनी श्रीमुक्ताबाई देवीच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्त्याच्या आखाड्यानं लोकांचे मनं जिंकली.
गुंजाळवाडी (बेल्हे) येथे यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाबरोबरचे कुस्त्याचा आखाडा भरविण्यात आला होता. त्यामध्ये शिरूर, संगमनेर, पारनेर, अहमदनगर, जुन्नर, शिक्रापूर, वाघोली व मोशी समवेत राज्यातील नामांकित मल्लांनी हजेरी लावली असल्याचे आयोजक रामभाऊ बोरचटे, सरपंच लहू गुंजाळ यांनी सांगितले. मल्लांनी एकापेक्षा एक काळजाचे ठोके चुकवयला लावणारे डाव टाकून रसिकांच्या डोळ्यांची पारणे फेडली.
आखाड्यात एकशे चाळीस मल्लाच्या जोडीच्या कुस्त्या लावण्यात आल्या. पन्नास रुपयांपासून मल्लावर सुरु झालेली बोली चार हजार रुपयांच्या घरात गेली होती. स्पर्धेसाठी पंच म्हणून पांडुरंग गाडेकर, निवृत्ती भुजबळ, आनंदा बोरचटे, बन्सी मटाले यांनी काम पाहिले. यावेळी आमदार शरद सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामु बोरचटे, जाणकू डावखरे, वसंत कदम, धोंडिभाऊ पिंगट, मुरलीधर गुंजाळ, वामन बोरचटे आदींनी कुस्त्याचा आनंद लुटला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)