“गुंजवणी’च्या पाणी वाटपावर आमदार थोपटेंचा आक्षेप

भात पिका व्यतीरिक्‍त कोणतेही पिके न घेण्याचे सुधारीत अहवालात नोंदविले : शेतकरी संतप्त
वेल्हे- वेल्हे तालुक्‍यातील गुंजवणी धरणाच्या पाणीवाटपाबाबत राज्यस्तरीय समितीने सादर केलेल्या सुधारित अहवालास आमदार संग्राम थोपटे यांनी आक्षेप घेतला असून अहवालात अनेक चुकीच्या गोष्टी नोंदविल्या गेल्या आहेत. यामध्ये तालुक्‍यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्याबाबत सुचविले आहे. तर भोर-वेल्हे तालुक्‍यात भात पिकासाठी भोर-वेल्हेसाठी केवळ अनुक्रमे 25 टक्केच दिले आहे तर भात पिका व्यतीरिक्‍त कोणतेही पिके घेऊ नये असे दाखविले आहे. याबाबत मुख्यामंत्र्यासह संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी आज (रविवारी) पत्रकार परिषदेत दिली आहे.
जिल्हा परीषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे उपसभापती दिनकर सरपाले, कॉंग्रेसचे भोर तालुका अध्यक्ष शैलेश सोनवणे, विष्णु राऊत, माजी सभापती रघुनाथ कथुरे, माजी उपसभापती चंद्रकांत शेंडकर, माजी उपसभापती डॉ.संभाजी मांगडे, दिलीप बाठे, दत्तात्रय दिघे, प्रकाश जेधे, राजाराम देवगिरीकर, बळीबा आधवडे, प्रभाकर आधवडे, शंकर जेधे आदीसह गुंजवणी प्रकल्पग्रस्त व शेतकरी उपस्थित होते.
आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, वेल्हे तालुक्‍यातील गुंजवणी धरणाचे पाणी वाटपाबाबत राज्य तांत्रिक समिती नेमण्यात आली होती. या समितीने दि. 21 जुलैला या समितीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा धरणग्रस्त यांचा समावेश न करता अहवाल तयार करण्यात आला आणि हा सुधारीत अहवाल या राज्यस्तरीय समितीने राज्यसरकारकडे सादर केला असून यो दोन्ही अहवालामध्ये बरीच विसंगती आहेत. त्यामुळे यातील प्रकल्पग्रस्त व लाभार्थ्यांवर अन्याय होत असल्याने या प्रस्तावास आमदार थोपटे व शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. या अहवालमध्ये भोर व वेल्हे तालुक्‍याचे मुख्य पीक भात असून या भात पिकास सिंचनाद्वारेपाणी देण्यास सुचविले आहे. भातपिकास सिंचनाद्वारे पाणी दिल्यास भात पिके राहणार नाहीत. तर भोर-वेल्हे तालुक्‍यात मुळ अहवालात भोर तालुक्‍यात 28 टक्के व वेल्हे 40 टक्के भातक्षेत्र होते; परंतु नवीन अहवालनुसार कमी करुन भोर व वेल्ह्यासाठी प्रत्येकी 25 टक्केच पाण्याचे क्षेत्र सुचविले आहेत. ठिबक सिंचनाद्वारे भातपिके घेणे म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा केल्यासारखे दिसत आहे. भोर-वेल्हे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी केवळ भातपिकेच घ्यावी व इतर कोणतेही पिके घेऊ नयेत असे अहवालात नमुद केले आहे. तसेच गुंजवणीचे पाणी मुळ अहवालात पाटाद्वारे शेतकऱ्यांना देण्याची तरदुत होती; परंतु नवीन अहवालात वितरण व्यवस्था बंद पाइपद्वारे व ठिबक सिंचनाद्वारे प्रस्तावित केली असून शेतकऱ्यांना आर्थिक भुंर्दंड पडणार आहे. याची देखभालदुरुस्ती स्वत: शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. तर मुळ अहवालात एकही उपसा सिंचन योजनाप्रस्तावित नव्हती तर नवीन अहवालात नारायणपूर उपसासिंचन योजना (दिडशे कोटी) प्रस्तावित आहे तर भोर व वेल्हे तालुक्‍यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यासाठीकाय तरदुत केली आहे हे समजुन येत नसल्याचे आमदार थोपटे यांनी नमूद केले.

  • वेल्ह्यातील उपसिंचनासाठी उल्लेखच नाही
    वेल्हे तालुक्‍यातील उपसासिंचनासाठी वांगणी, वाजेघर, रांजणे, खामगाव तर 20 किलोमीटर उजवा कालवा, डावा कालवा याबाबत काहीही उल्लेख नाही. तसेच मुळ अहवालात पाण्याचे क्षेत्र भोरसाठी 7285 व वेल्ह्यासाठी 685 इतके होते तर नवीन अहवालात भोरसाठी 9435 आणि वेल्ह्यासाठी 850 क्षेत्र वाढविले आहे. क्षेत्र वाढुनही गावांची संख्या वाढली नाही. तर गुंजवणी प्रकल्पात मुळ प्रकल्प अहवालात धरणाजवळ 2 मेगावॅट इतकी विद्युत निर्मिती प्रस्तावित होती;परंतु नवीन अहवालात शासनाने तत्वत मान्यता देताना धरणाजवळ विद्युतगृह उभारुन त्यानंतर बंद पाइपलाइन करणेचे नियोजित होते.त्यास दि 21 एप्रिल 2017 रोजी शासनाने तत्वत मान्यता दिली आहे. परंतु प्रस्तावित नवीन अहवाल तयार करताना विद्यूत गृहाचा कोठेही विचार केल्याचे दिसुन येत नाही. त्यामुळे 2 मेगावॅट विद्युत निर्मिती होणार नाही. त्यामुळे शासनाचे दरवर्षी 3.28 कोटी इतके उत्पन्न बंद होणार आहे.

 

  • भातपिक सिंचनाद्वारे करण्याचा नवीनच शोध
    केवळ भातपिकासाठी भोर-वेल्हे तालुक्‍यासाठी अनुक्रमे 25 टक्केच पाणी गुंजवणी धरणाचे पाणी देण्याचे सुचविले आहे तर गहु, हरभरा, ज्वारी या पिकासाठी शुन्य टक्के पाणी सुचविले आहे. तर भातपिक सिंचनाद्वारे करण्याचा नवीनच शोध लावला आहे. गुंजवणी धरणावर वीज निर्मिती केंद्र प्रस्तावित असूम यापासून दरवर्षी शासनास 3.28 कोटी उत्पन्न मिळण्याचे होते; परंतु नवीन अहवालात याबाबत कोयना विभाग किंवा अन्य कोणाचाही सल्ला घेतला नाही. मुळ अहवालात भिजणारे क्षेत्र 16500 हेक्‍टर होते; परंतु नवीन अहवालात 21392 हेक्‍टर इतके आहे. भिजणारे क्षेत्र जरी वाढले असले तरी ड्रीपचा खर्च कोण करणार हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)