गुंजन सक्‍सेनाची भूमिका साकारणार जान्हवी कपूर

जान्हवी कपूरने शशांक खेतान यांच्या “धडक’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये दमदार पर्दापण केले. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्‍शनने केली होती. त्यानंतर आता जान्हवी कपूर पुन्हा एकदा करण जोहरच्या बॅनरखाली चित्रपटात झळकणार आहे.

करण जोहरच्या प्रॉडक्‍शन निर्मित तिस-या चित्रपटासाठी जान्हवीने साईन केल्याचे वृत्त आहे. या चित्रपटात ती चॉपर पायलटची भूमिका साकारणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे नाव अद्याप निश्‍चित झाले नसून हा चित्रपट भारतीय हवाई दलातील पहिली महिला चॉपर पायलट गुंजन सक्‍सेना यांच्यावर आधारित आहे. गुंजन सक्‍सेनाने कारगिल युद्धात शौर्य दाखवित अनेक सैनिकांचे प्राण वाचविले होते. याप्रसंगी तिच्या विमानावर शत्रुकडून हल्लाही करण्यात आला होता.

दरम्यान, जान्हवी आणि गुंजन यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरून जान्हवीने हा चित्रपट साईन केल्याचे स्पष्ट होते. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

तत्पूर्वी जान्हवीने “तख्त’ चित्रपट साईन केला असून यात करिना कपूर, आलिया भट्‌ट आणि रणवीर सिंह यासारखे स्टार्स कलाकार झळकणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)