गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या फॅमिली डॉक्‍टरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

धनकवडी, संभाजीनगर येथील प्रकार


विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांचा आदेश

पुणे- धनकवडी, संभाजीनगर येथे अल्पवयीन रुग्ण मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या फॅमिली डॉक्‍टरचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी हा आदेश दिला आहे.
डॉ. उदय सुरेश शहा (वय 47, रा. संभाजीनगर, धनकवडी) असे अटकपूर्व जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीने स्वत: फिर्याद दिली आहे. ही घटना सन 2017 च्या गणपती विसर्जनानंतर दोन दिवसांनी घडली होती. फिर्यादी आजारी होती. त्यामुळे ती नेहमीप्रमाणे फॅमिली डॉक्‍टर शहा याच्याकडे गेली होती. त्यावेळी उपचार करण्याच्या बहाण्याने शहा याने तिला इंजेक्‍शन करून एक गोळी खायला दिली. त्यामुळे फिर्यादीला गुंगी आली. त्यावेळी त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्या मुलीला त्याने पिस्तुल दाखवून धमकाविले. याबाबत कोणास काही सांगितल्यास आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी त्याने तिला दिल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात डॉ. शहा याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. समाजात डॉक्‍टरला देव समजले जाते. डॉक्‍टरचा आदर केला जातो. त्या विश्‍वासाचा शहा याने गैरफायदा घेतला आहे. गुन्ह्याच्या वेळी ती मुलगी अल्पवयीन होती. त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचे वैद्यकीय पुराव्यावरून प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्याची सक्षमतेची चाचणी करण्यासाठी, तसेच त्याने तिला कोणते इंजेक्‍शन आणि कोणती गोळी दिली, गुन्ह्याच्या वेळी त्याच्या अंगावर असलेले कपडे, तिला दाखविलेले पिस्तुल जप्त करण्यासाठी अटक करून त्याच्याकडे तपास करणे गरजेचे आहे. बचाव पक्षातर्फे त्या मुलीची द्विधा मनस्थिती असल्याचा बचाव करण्यात आला. हा मुद्दा खोडून काढताना पीडित मुलीने वैद्यकीय तपासणीच्या वेळी आणि न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेला जबाब सारखाच असल्याचे बोंबटकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार न्यायालयाने डॉ. शहा याचा जामीन फेटाळला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)