गीता मंदिर शाळेला आदर्श शाळा पुरस्कार

चिंचवड – पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या वतीने गीतामंदीर प्राथमिक शाळेला आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर राहुल जाधव आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाळेला सन्मानित करण्यात आले. तसेच शाळेच्या शिक्षिका हस्लिम बाबासाहेब भालदार व आशा बसण्णा बनसोडे यांना ही आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला. शाळेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसर गेली 52 वर्षापासून संस्कारक्षम व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची परंपरा अविरतपणे चालू आहे. पिंपरी चिंचवड शहरात सर्वांत ज्येष्ठ व मानाची शाळा म्हणून शाळेचा नावलौकिक आहे. या शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी डॉक्‍टर, अभियंते, उद्योजक, राजकीय नेते, अभिनेते, शास्त्रज्ञ तसेच सैन्यात मेजर पदावर काम करीत आहेत. सैन्यात मेजर पदावर काम करीत आहेत. मुख्याध्यापक महेंद्र भोसले यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)