गिर्यारोहकांचा गट विमा काढणार – विनोद तावडे

आंबेनळी दुर्घटनेत मदतकार्य केलेल्या गिर्यारोहकांचे कौतुक
मुंबई – डोंगर-दऱ्यामध्ये उतरून स्वत:चा जीव धोक्‍यात घालून अपघातग्रस्तांना बाहेर काढणाऱ्या गिर्यारोहकांची आता सरकारदरबारी दखल घेण्यात आली आहे. आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या अशा जिगरबाज गिर्यारोहकांचा सरकार गटविमा काढणार आहे. त्यासाठी विविध विमा कंपन्यांशी चर्चा करणार असल्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कर्मचाऱ्यांना महाबळेश्वर येथे घेऊन जाणारी बस पोलादापूर मार्गावरील आंबेनळी घाटात 500 फूट दरीत दुर्घटनाग्रस्त झाली होती. या बसमधील 30 जणांचा मृत्यू झाला होता. या बसमधील व्यक्तींचे मृतदेह दरीतून वर काढण्याच्या मदत कार्यात महाबळेश्वर, महाड आणि पोलादपूर येथील गिर्यारोहण संस्थांच्या सदस्यांनी निरपेक्ष आणि कर्तव्य भावनेतून काम केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यांच्या या जिगरबाज कामगिरीबद्दल क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज या मंत्रालयात गिर्यारोहकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. यावेळी तावडे यांनी त्यांना भेट म्हणून पुस्तक दिले. यावेळी क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाचे अधिकारी यांच्यासह सह्याद्री मित्र, यंग ब्लड ऍडव्हेन्चर्स, महाबळेश्वर ट्रेकर्स, सहयाद्री ट्रेकर्स यांच्यासह ट्रेकर्स ग्रुप उपस्थित होते.

तावडे म्हणाले, ज्यावेळी अपघात झाल्याचे कळते किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये गिर्यारोहक मदत करायला जातात. त्यावेळी सामाजिक जाणीव आणि कर्तव्यातून समाजात राहणाऱ्या लोकांची मदत करीत असतात. त्यांचे काम आणि त्यांची कर्तव्यभावना लक्षात घेऊन त्यांचे जीवनही सुरक्षित असणे तितकेच आवश्‍यक आहे. म्हणूनच येणाऱ्या काळात या गिर्यारोहकांचा गट विमा काढणे याला प्राधान्य देण्यात येईल. या संदर्भात विविध विमा कंपन्यांना येथे बोलावून गिर्यारोहकांचा गट विमा काढावा, असे सांगण्यात येईल.

पोलीसांमार्फत ओळखपत्र…
आपत्कालीन परिस्थितीत जेव्हा हे गिर्यारोहक बचतकार्यासाठी जात असतात तेव्हा त्यांच्य्याकडे अत्याधुनिक सामुग्री असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात 20 जिल्हयातील गिर्यारोहक ग्रुप यांना क्रीडा विभागामार्फत अत्याधुनिक सामुग्री देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

याबरोबरच गिर्यारोहकांना पोलीसांमार्फत ओळखपत्र दिले गेल्यास त्यांना मदत करण्यासाठी जाताना या ओळखपत्राचा फायदा होईल. त्यामुळे याबाबतही पोलीसांबरोबर चर्चा करण्यात येईल, असे तावडे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)