गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार : एकनाथ खडसे

जळगाव : पक्षाने आदेश दिल्यास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचे वक्तव्य भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले आहे. जळगाव मनपा निवडणुकीनिमित्त त्यांनी निवासस्थानी पत्रकारांशी चर्चा करताना हे वक्तव्य केले.

“सध्या गिरीश महाजन हे जिल्ह्याचे नेते आहेत. पण मी पक्षाचा कोणताही नेता नाही. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्त्वात मी काम करण्यास तयार आहे. पण हे करताना मी कोणत्याही वाईट प्रवृत्तींना साथ देणार नाही” असेही खडसे म्हणाले. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील विळ्याभोपळ्याचं वैर सर्वश्रुत आहे. तरी खडसेंच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार डॉक्टर सतीश पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले. सतीश पाटलांनी आपल्या पक्षाचे नगरसेवक निवडून येतात का याकडे लक्ष द्यावे. तसेच आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत कदापिही जाणार नसल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले.

“जळगावात कोणतेही पाठबळ नसताना यापूर्वी आपण 33 नगरसेवक निवडून आणले आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्ष विजयी केला. त्यावेळी फक्त एकट्या नाथाभाऊने जळगावात पक्ष वाढविला. निवडणुका सुरु होऊ द्या. माझ्या हातात भरपूर काही आहे. आगे आगे देखो होता है क्या…” असे खडसे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)