गिरीजात्मजाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

शिवनेरी- ंकष्टी चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे सोमवार (दि. 26) भाविकांनी गर्दी केली होती. यामुळे लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. पहाटे 4 वाजता देवस्थान ट्रस्टचे खजिनदार सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक आणि महाआरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, भगवान हांडे आणि कर्मचारी, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस आणि मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी 6 वाजता आणि दुपारी 12 वाजता महाआरती करण्यात आली. देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांना विविध सेवा पुरविण्यात आल्या. सायंकाळी मंदिरात श्री मुक्ताई भजनी मंडळ, शिवेची वाडी यांचे भजन झाले. रात्री 9:09 वाजता चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. यावेळी मोठया प्रमाणात भाविक मंदिरात उपस्थित होते. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देवस्थानमार्फत भाविकांसाठी दर्शन मार्गावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर आणि सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)