गिरवली येथील साकव पुलाचे भूमिपूजन

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील गिरवली येथे 35 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात येणाऱ्या साकव पुलाचे भूमिपूजन आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. साकव पूल होणार असल्याने पावसाळ्यात दळणवळणाची होणारी गैरसोय टळण्यासाठी मदत होणार आहे.
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या सहकार्याने आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भानुदास काळे यांच्या प्रयत्नातून गिरवली ग्रामपंचायत येथे भैरवनाथवाडी ते पांडुरंगवाडी ओढ्यामध्ये पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच संतोष सैद, उपसरपंच सुशीला सैद, माजी सरपंच कैलास सैद, ग्रामपंचायतीचे सदस्य देवराम सैद, सुभाष ढोरे, मिना सैद, अजय गभाले, सुदर्शन चपटे, ग्रामसेवक जयवंत मेंगडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदर ओढ्यामध्ये पावसाळ्यात पुरामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत होत्या. पुलामुळे भैरवनाथ वाडी, पांडुरंग वाडी, गभाले वाडी, डांगले वस्ती, हनुमान वाडी येथील शेतकऱ्यांना दळणवळणाचा प्रश्‍न कायमचा सुटण्यासाठी मदत होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)