जिगोलोचे लोण आता साताऱ्यातही

प्रशांत जाधव, सातारा, दि. 14 –

शांत, पेन्शनरांचे शहर अशी ख्याती असलेल्या साताऱ्यात आता जिगोला संस्कृतीने पाय रोवले आहेत. महानगरात रुळलेल्या या संस्कृतीने पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. वेबसाईटच्या माध्यमातून तरूणाईला  महिन्याला हजारो रुपये कमविण्याचे आमिष या वेबसाईटवर दाखवले गेले आहे. वेबसाईटवरूनच नोंदणी करून तरूणांना या संस्थेचे सभासद होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे
महानगरात सुरू असलेल्या जिगोलोचे लोण आता साताऱ्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात पसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिक्षणावर खर्च होत असलेला अमाप पैसा, त्यानंतरही नसलेली नोकरीची हमी, वाढलेला चंगळवाद या सगळ्यामुळे पैसा कसा कमवायचा हा तरूणाईला पडलेला प्रश्‍न आहे. नेमका याचाच फायदा घेत जिगोलो पुरवणाऱ्या संस्थांनी पैशाचे आमिष दाखवत सोबत मनोरंजानाची हमी देत तरूणाईला आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम सुरू केले आहे. पैसा कमावण्याच्या नादात सुशिक्षीत तरूण या संस्कृतीचे बळी ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. झटपट पैसा मिळवणे आणि चंगळवादातून सुरु झालेली ही महानगरीय संस्कृती आता साताऱ्यात व्यवसाय म्हणून पाय पसरु लागली आहे.

जिगोलोच्या विविध वेबसाईटवर या संस्कृतीची सर्व माहिती दिली गेली आहे. या संस्थेसोबत काम करणाऱ्या युवकांना वेगवेगळी पॅकेजेस दिली गेली आहेत. यामध्ये स्टॅंडर्ड, सिलव्हर, गोल्डन अशी पॅकेजेसची सोय आहे. वेबसाईट संस्थांगणीक या पॅकेजेसची नावे बदलली असली तरी दर आणि कार्यपध्दती समान आहे. यामध्ये स्टॅंडर्ड पॅकेज हे एक महिन्याचे असून त्यासाठी सभासद होणाऱ्या युवकाला दोन हजार रूपये भरावे लागणार आहेत.

त्यानंतर सभासद झालेल्या तरूणाला त्या एका महिन्यात किमान चार महिलांसोबत त्यांच्या मर्जी नुसार संबंध ठेवावे लागणार आहेत. तर सिल्व्हर पॅकेजमध्ये महिन्याला पाच हजार भरून दहा महिलांशी तर गोल्डन पॅकेजमध्ये ही महिन्याला दहा हजार भरून दहा महिलांशी संबंध ठेवता येणार आहेत.

या पॅकेजेसमध्ये शरिरसंबंध ठेवल्यानंतर त्या सभासद युवकाला प्रति महिना दहा हजार ते वीस हजार कमावण्याचे आमिष या संस्थेने वेबसाईटवर दिले आहे. सभासद होणाऱ्या तरूणालाही संस्था महिलांशी कसे बोलावे, स्वत:चे मार्केटींग कसे करावे, महिलांशी बोलताना कोणत्या चुका करू नयेत यासाठीचे प्रशिक्षण देणार असल्याचेही नमुद करण्यात आले आहे. तसेच केवळ अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात महिलांचे कॉल येऊन जिगोलो म्हणून जावे लागेल अशी ही हमी देण्यात आली आहे.

या संस्थेच्या माध्यमातून पुरूष वेश्‍या ही संस्कृती वाढीस लागणार असून पैशाच्या हव्यासापोटी तरूणाईच्या भविष्याचा कोळसा होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत निर्णय सुज्ञ सातारकरांनी व स्थानिक पोलिस दलाने ठोस पावले उचलण्याची गरज  आहे.

जिगोलो म्हणजे काय?
यापुर्वी फक्त महिलाच देह विक्रेयाच्या व्यवसायात असायच्या. आर्थिक सुबत्ता वाढल्याने तसेच विचार-कृती स्वातंत्र्याने चंगळवाद वाढला आहे. बदलत्या जिवनशैलीमुळे आणि एकटेपणामुळे शरीर सुख मिळवण्यासाठी पिळदार शरिरयष्टी असलेल्या तरूणांची मागणी करतात. महिलांना पैसे घेऊन शरीरसुख देणाऱ्या अशा युवकांना जिगोलो असे म्हणतात. अशा तरूणांना मिळणारी टिप ही मोठ्या प्रमाणात असते . मिळणारे पैसे आणि चंगळवादाच्या जोडीमुळे हा व्यवसाय आता महानगरांबरोबरच साताऱ्यासारख्या लहान गावांमध्ये ही पसरु लागला आहे.

…अशीच झाली दोघांची फसवणूक
यापुर्वी महिलांची शरीरसुखासाठी युवक पाहिजेत, अशी जाहिरात आली होती. त्यावेळी साताऱ्यातील दोघांची मिळुन सहा लाखाची फसवणूक झाली होती. एकाने साडे पाच लाख तर एकाने पंच्चेचाळीस हजार संबंधितांकडे भरले होते. मात्र त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले. पण बदनामीच्या भितीने लोक तक्रार देत नाहीत. याचाच फायदा घेतला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)