गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी

खटाव – गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी’ हे मंजुळ गीत सर्वांनाच परिचीत आहे. सध्या खटाव परिसरामध्ये सध्या सकाळी-सकाळी वासुदेवाचे दर्शन होऊ लागले आहे. पुर्वी हमखास दिसणारा व टाळांच्या व चिपळ्यांच्या आवाजाने व ‘वासुदेव आला हो वासुदेव आला’ अशा गीतातून झोपेतून जागे करणाऱ्या वासूदेवाचे दर्शन आता दुर्मिळ झाले आहे. तथापि, खटाव परिसरात हा सांस्कृकि वारसा जपणारे काही वासूदेव अधून-मधून दिसत आहेत.

पांडुरंगाचे अभंग, गवळणी, कृष्णगीते गाणारा व गीतांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारा हा वासूदेव महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटकच आहे. छत्रपती शिवरायांनी या वासुदेवांचा आपल्या मावळ्यांना निरोप पाठविण्यासाठी व हेरगिरीसाठी उपयोग केला. वासुदेवाची परंपरा सुमारे हजार ते बाराशे वर्षापूर्वीची आहे. संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ आदी संताच्या अभंगामधून वासूदेवाचा उल्लेख आढळतो. आज काळाच्या ओघात वासुदेव नष्ट होत चालल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. भविष्यातील पिढीस तो चित्रातच दाखवावा लागणार असेच भासत आहे. वास्तविक या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याची गरज आहे. अन्यथा हा लोककलावंत काळाच्या पडद्याआड नष्ट होवू शकतो.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)