गावा-गावातून फिरा म्हणजे केलेला विकास दिसेल

आमदार शंभूराज देसाई यांचा उरूल येथे विरोधकांना सल्ला

काळगाव – तालुक्‍यातील गावात मीच नव्याने केलेल्या मोठमोठ्या रस्त्यावरुन जावून माजी आमदार पाटणकर पुत्र विचारतायत आमदारांचा विकास कुठे आहे. कोट्यावधीच्या निधीच्या त्यांच्या नुसत्याच घोषणा आहेत.यापूर्वीच्या काळात या तालुक्‍याने त्यांच्या रस्त्यांना लाखात नाहीतर कोटयावधी रुपयांचा निधी मंजूर झालेला कधी पाहिला नाही. मतदारसंघाचा जबाबदार आ. म्हणून माझा माजी आमदारपुत्रांना स्पष्ट सल्ला आहे त्यांनी मी कोट्यावधी रुपयांचा केलेला विकास पहावयाचा असेल तर तालुक्‍यातील प्रत्येक गावातून फिरावे असा टोला आमदार शंभूराज देसाई यांनी माजी आमदारपुत्र सत्यजितसिंह पाटणकरांना दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऊरुल, ता. पाटण येथे उरुल ते बोडकेवाडी या रस्त्यांच्या भुमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, शिवदौलत बॅंकेचे चेअरमन मिलिंद पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, कारखाना व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, संचालक शशिकांत निकम, अशोकराव डिगे, बबनराव भिसे, नितीन निकम, अनिल निकम, आबदारवाडी सरपंच विजय शिंदे, सरपंच वैशाली मोकाशी, सरपंच डॉ. आण्णासो देसाई, उपसरपंच श्रीमती सुलोचना देसाई, रमेश देसाई, विवेक देसाई, विकास देसाई, अशोक सुर्वे, अरुण सुर्वे, सुशांत सुर्वे, हेमंत देसाई, दादासो देसाई, शिवाजी देसाई, बजरंग माने, आबा माने, सुर्यकांत लोहार, मंगल सुर्वे, धनाजी देसाई, विकास देसाई, राहूल देसाई, अरविंद देसाई उपस्थित होते.

यावेळी आमदार देसाई म्हणाले, गेली साडेचार वर्षे काम करताना मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांकरीता कोट्यावधी रुपयांचा निधी शासनाच्या तिजोरीतून मंजूर करुन आणला आहे. मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात विकासाची कामे सुरु असताना आणि माझ्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधीच्या रस्त्यांवरुनच जावून आपले विरोधक मतदारसंघाचे माजी आमदार यांचे सुपूत्र आमदारांचा कुठाय विकास त्यांच्या तर कोट्यावधीच्या नुसत्याच घोषणा आहेत, अशी सातत्याने टिमकी वाजवित आहेत. माझे त्यांना उघडपणे आवाहन आहे त्यांना माझा विकास कुठाय तो पहायचा असेल तर त्यांनी मतदारसंघातील गावागावात जावून यावे. आतापर्यंत तुमच्या काळात याच मतदारसंघातील जनतेने विकास पाहिला तो केवळ कागदावर. आताच्या काळात तो कागदावरचा विकास प्रत्यक्षात मतदारसंघातील जनतेला दिसू लागला आहे.

2019 च्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना गेल्या साडेचार वर्षात मी मतदार संघाच्या कानाकोपऱ्यात केलेला विकास हा एकच मुद्दा आणि अजेंडा घेवून मतदारसंघातील जनतेच्या पुढे मी मते मागायला जाणार आहे. परंतु नुसत्याच गप्पा मारणारे आणि काहीही करायला न जमलेले माजी आमदार पुत्र हे कोणत्या तोंडाने मतदारांपुढे मते मागायला जाणार आहेत साडेचार वर्षाच्या कार्यकालात त्यांनी मतदारसंघातील गांवाना एक नव्या रुपयांचा निधी त्यांना देता आला नाही. जनतेची कामेच केली नाहीत तर जनतेला मते मागायचा यांना अधिकारच नसल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, सरपंच वैशाली मोकाशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सुभाष देसाई यांनी केले. तर आभार विजय पाटील यांनी मानले. यावेळी उरुल, ठोमसे व बोडकेवाडी येथील पदाधिकारी व ग्रामस्थ,महिला या मोठया संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)