गावाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी शासन कटिबध्द

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

कोल्हापूर – ग्रामस्वराज्य अभियान कार्यक्रमांतर्गत समाविष्ठ 7 योजनांचे उद्दिष्ट 100 टक्के साध्य करण्याचा बहुमान तिळवणी गावाने पटकावला असून तिळवणी गावाच्या सर्वांगिण विकास आणि उन्नतीसाठी शासन कटिबध्द राहील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना दिली. ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत जिल्ह्यातून तिळवणी गावाची निवड करण्यात आली असून या गावास पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थींना गॅस कनेक्‍शनचे वाटप पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते आज तिळवणी येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

ग्रामस्वराज्य अभियानातून जनतेला सुखी, आनंदी, स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनविण्याच्या दृष्टीने विविध योजना हाती घेण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या अभियानांतर्गत देशातील 20 हजार गावांची निवड झाली असून महाराष्ट्रातील 192 गावे तर कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ तिळवणी गावाची निवड झाली आहे. हे अभियान 14 एप्रिल पासून सुरु झाले असून 5 मे पर्यंत सुरु राहणार आहे. या अभियानांतर्गत प्रामुख्याने 7 योजनांवर भर दिला असून यामध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र कुटुंबांना गॅस कनेक्‍शन, सहज बिजली घर योजना, उज्जाला योजना, जनधन योजना, जीवन ज्योती आणि सुरक्षा विमा योजना आणि मिशन इंद्रधनुष्य या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनांची कामे तिळवणी गावात 100 टक्के पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

महिला सक्षमीकरणावर शासनाने अधिक लक्ष केंद्रीत केले असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 4 वर्षापूर्वी देशातील 5 कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्‍शन दिण्याचा संकल्प केला होता तो आता पूर्णत्वास जात आहे. ज्येष्ठ नागरीक, तरुण, मुली आणि महिलांसाठीही अनेकविध योजना हाती घेतल्या असून गरोदर महिलेला 5 हजार अनुदान देण्याचे क्रांतिकारी योजनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केली आहे. या बरोबरच पंतप्रधान जीवन जीवन ज्योती योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेद्वारे जनतेला सुरक्षा कवचही उपलब्ध करुन दिले आहे. तसेच जनतेला दरमहा 5 हजार रुपये पेंशन देणारी अटल पेंशन योजना ही महत्वाची असून या सर्व योजनांचा जिल्ह्यातील जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, जिल्ह्यात 14 एप्रिल ते 5 मे या कालावधीत ग्रामस्वराज्य अभियान राबविले जात असून या अभियानातील समाविष्ठ योजनांची 100 टक्के अंमलबजावणी करण्यास प्राधान्य दिले आहे. तिळवणी गावात 814 घरांना या सर्व सुविधा 100 टक्के उपलब्ध करुन देण्यात आल्या असून यागावाच्या विकासासाठी प्रशासन अधिक सज्ज आणि सतर्क राहील. तिळवणी गावासाठ स्वच्छ भारत अभियानांतर्गत 18 लाख रुपये खर्चाची योजना मंजूर केली असून ती लवकरच मार्गी लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील. तसेच तरुणांना व्यवसाय, प्रशिक्षण मिळावे यासाठी कौशल्य मिळावे घेण्याबरोबरच बचत गटांना शुन्य टक्के व्याज दराने अर्थ सहाय्य उपलब्ध करुन देण्यावर शासनाने भर दिला आहे.

याप्रसंगी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे म्हणाले, ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत तिळवणी गावाची निवड केली असून यागावात प्रशासनाच्या वतीने समाविष्ठ योजनांची 100 टक्के अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे तिळवणी गाव जिल्ह्यात, राज्यातच नव्हे तर देशात पहिले गाव ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तिळवणी गावातील ग्रामस्थांनी प्रशासनास दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)