गावडेवाडी येथे चोरट्यांचा धुमाकुळ

सहा ठिकाणी घरफोडी : एक लाखाचा ऐवज लंपास

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील गावडेवाडी येथे सोमवारी (दि.25) चोरट्यांनी धुमाकूळ घालत सहा ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. यामध्ये सुमारे 60 हजार रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे.

गावडेवाडी गावातील पिंपळमळा येथील भाविक मढी येथील कानिफनाथ यात्रेसाठी रविवारी (दि. 24) सकाळी गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी शरद नामदेव गावडे, मंदा खंडु गावडे, नारायण विठ्ठल गावडे, धनंजय सतुजी पिंपळे यांच्या बंद घरांचा कडीकोंयडा उचकटून आतमध्ये प्रवेश केला आणि कपाटातील उचकापाचक करुन साड्या व किरकोळ साहित्य चोरुन नेले आहे. तसेच गावठाणातील सविता शिंर्के यांच्या घरातील भाडेकरु प्रदीप सत्रे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी कपाटातील कपडे अस्ताव्यस्त केले.तुकाराम सखाराम गावडे यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला.

पिंपळमळ्यातील मंदा खंडु गावडे यांचे बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाट उचकटुन त्यातील अडीच तोळ्याचे सोन्या-चांदीचे दागिने आणि अंदाजे 55 ते 60 हजार रुपयांची रोकड चोरुन नेली आहे. मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)