गावडेवाडी येथे करिअर मार्गदर्शन

मंचर-आबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील आदर्शगाव-गावडेवाडी येथे मंगळवारी (दि. 1) मे महाराष्ट्रदिनानिमित्त ध्वजारोहण, प्रभातफेरी, करीअर मार्गदर्शन, मोफत वह्यांचे वाटप, निकाल वाटप आदी कार्यक्रम हिरकणी विद्यालयात होणार असल्याची माहिती मुख्याध्यापक विनोद बोंबले यांनी दिली. आदर्शगाव-गावडेवाडी येथील उपक्रमशील हिरकणी विद्यालयातील मंदाकिनी अंकुश गावडे सभागृहात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मुंबई येथील ज्येष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट रमेश अंकुश गावडे यांचे करिअर विषयक मार्गदर्शन करतील. तसेच ललिता रमेश गावडे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात येणार आहेत. याप्रसंगी श्री गुरुदत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय पिंपळे, उपाध्यक्ष कांताराम गावडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर माऊली गावडे, सचिव दशरथ शेळके, ग्रामस्थ, पालक उपस्थित राहणार असल्याचे मुख्याध्यापक विनोद बोंबले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)