पुणे : गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक

पुणे – गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरूणास गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्याच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणी चार काडतूसे असा 50 हजार 200 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
मयुरेश ज्ञानेश्‍वर बिबवे(27,रा.बिबवेवाडी गावठाण) असे अटक आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील हे पथकासह घरफोडी व चोरीच्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेत होते. यावेळी चतुश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उप निरीक्षक हर्षल कदम यांना मयुरेश पिस्तूलासह तेथे येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, हर्षल कदम, दिनेश पाटील, पोलीस कर्मचारी सचिन जाधव, इरफान मोमीन, सुधाकर माने, रिजवान जिनेडी, प्रकाश लोखंडे, मेहबुब मोकाशी, अशोक माने, तुषार खडके, सुभाष पिंगळे, गजानन सोनुने, प्रशांत गायकवाड यांच्या पथकाने केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)