गावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी दोघे ताब्यात

संजय पाटील खून प्रकरणातील एका आरोपीचा समावेश
कराड दि. 9 (प्रतिनिधी) –
गावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी छापा टाकून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. विंग ता. कराड येथे कराड-ढेबेवाडी रस्त्यालगत असलेल्या हॉटेल परिसरात शनिवार दि. 8 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामध्ये त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल व दोन रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवाच्या प्रारंभी गावठी पिस्टल व दोन रिकाम्या पुंगळ्या सापडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. कराड तालुका पोलिस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बाबासो रघुनाथ मोरे (वय 45) रा. पाचुपतेवाडी (तुळसण, ता. कराड) व अरुण मारुती कणसे (वय 28, रा. विंग ता. कराड) यांच्याकडे गावठी पिस्टल व दोन रिकाम्या पुंगळ्या आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस हवालदार शशी काळे यांना सूत्रांकडून विंग येथे गावठी पिस्टल घेऊन दोघेजण येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार ते सहकार्यांसह विंग येथील हॉटेल परिसरात गेले. त्यावेळी बाबा मोरे व अरुण कणसे हॉटेल समोर उभे असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून झडतीवेळी बाबा मोरे याच्याकडे एक गावठी पिस्टल तर अरुण कणसे याच्याकडे दोन रिकाम्या पुंगळ्या सापडल्या. त्या पोलिसांनी जप्त केले असून दोघांनाही ताब्यात घेऊन अटक केली आहे.
दरम्यान, कुख्यात गुंड बाबासो रघुनाथ मोरे याला यापूर्वी पै. संजय पाटील खून खटल्यात, तसेच अपहरण, विनयभंग व अवैध शस्त्र जवळ बाळगल्या बाबतच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्याबाबत त्याच्यावर पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जप्त करण्यात आलेल्या सिल्वर कलरच्या पिस्टलची किंमत 25 हजार रुपये आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हाची नोंद झाली असून संबंधितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. अशोक क्षीरसागर, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहा.पोनि. चंद्रकांत माळी, पोह. महेश संकपाळ, धनंजय कोळी, शशिकांत काळे, अमित पवार, अमोल पवार, शशिकांत घाडगे यांनी केली. सदर गुन्ह्याचा तपास सहा. पोनि. चंद्रकांत माळी करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)