गावठी कोंबड्यांना मागणी वाढली

मंचर- आषाढ महिना संपायला शेवटचे पाच -सहा दिवस शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे ब्रॉयलर कोबड्यांऐवजी गावठी कोंबड्यांना मागणी वाढली असल्यामुळे गावठी कोंबड्यांचा बाजारभाव कडाडले आहे.
आषाढ महिन्यात घरोघरी गावठी कोंबड्‌यांना प्रचंड प्रमाणात मागणी असते. त्या तुलनेत सध्याच्या घडीला गावठी कोंबड्‌याचा बाजारभाव एक किलो दिड किलो वजनाच्या नगासाठी 600 ते 700 रुपयांच्या घरात गेला आहे. याबरोबरच गावठी कोंबडी 300 ते 350 रुपयांना मिळत आहे, अशी माहिती कळंब येथील चिकन अँड एग्ज चे विक्रेते इसाक शेख यांनी दिली आहे. गावठी कोंबड्‌यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे हा कोंबडा बाजारात मिळणे दुर्मिळ झालेले आहे. त्यामुळे बाजारात गावठी कोंबड्यांचा तुटवडा जाणवत असून या कोंबड्‌यांची चढ्या भावाने विक्री होत आहे. पूर्वी ग्रामीण भागांत अनेक घरांमध्ये मिळणारा गावठी कोंबडे होते. आता मात्र क्वचित ठिकाणीच हा कोंबडा आढळून येतो आहे, त्यामुळे मागणी असूनही पुरवठा नसल्याने या कोंबड्‌यांच्या बाजारभावात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आखाड पार्ट्यांसाठी गावठी कोंबड्यांना प्रचंड प्रमाणात मागणी असते. गावठी कोंबडा खाण्यासाठी चविष्ट आणि रुचकर असल्याने या कोंबड्‌याला मागणी वाढत असते. आखाडात गावठी कोंबड्‌याचा रुबाब वाढून भलताच भाव खाताना दिसत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)