गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात युवक जखमी

पाथर्डी: शहरात शेवगाव रस्त्यालगत एका हॉटेलमध्ये दोन युवकांमध्ये झालेल्या वादात गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेत गोळी खांद्याला चाटून गेल्याने एक युवक जखमी झाला आहे. 31 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. जखमीवर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून दिवसभर घटनेबाबत शहरात चर्चा सुरू होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील शेवगाव रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलसमोर 31 डिसेंबर रोजी रात्री दोन तरुणात वादावादी झाली. त्यातील एकाने गावठी कट्ट्यातून गोळी झाडली, ती दुसऱ्या युवकाच्या खांद्याला चाटून गेल्याने तो जखमी झाला. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. फिर्याद दाखल नसल्याने स्थानिक पोलिसांनी या घटनेबाबत फारसे गांभीर्य दाखवले नव्हते. मात्र घटनेबाबत पोलीस अधीक्षकांना माहिती समजताच त्यांनी स्थानिक पोलिसांना तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सायंकाळी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

नाथनगरमध्ये राहणाऱ्या संशयित आरोपीच्या घराची झडती घेतली. संबंधित जखमी युवकाचा जबाब घेण्यासाठी अहमदनगर येथे पथक रवाना करण्यात आले आहे.त्याचबरोबर संशयित आरोपीच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत, यातील आरोपी अल्पवयीन असल्याचे समजते. तपशीलवार माहिती व घटनाक्रम मिळवण्याचे काम सुरू आहे. घटनेची खात्री झाल्यानंतर याबाबत गुन्हा नोंदवण्यात येईल असे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी सांगितले.गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात युवक जखमी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)